सिबिल स्कोअर खराब झालाय काय? काळजी करून नका,हे आहेत सिबिल स्कोअर वाढविण्याचे उपाय

0
4

आता कर्ज काढताना प्रथम सिबिल स्कोर मागितला ‌जात आहे,आजही ग्रामीण भागात सिबिल स्कोर गैरसमज आहेत.या लेखात आम्ही सिबिल स्कोर नेमका काय असतो,तो काय केल्याने कमी होतो व वाढविण्यासाठी आपण काय करायला पाहिजे याविषयी माहिती देणार आहोत.

सिबिल स्कोअर हा तुमच्या क्रेडिट हिस्ट्री दर्शवतो आणि याच स्कोअरच्या आधारावर तुम्हाला खाजगी तसेच राष्ट्रीयकृत्त बँका कर्ज किंवा क्रेडिट कार्ड देतात.सिबिल स्कोअर बँकिंग किंवा वित्तीय संस्थांमध्ये खूपच महत्वाचा मानला जातो.
बघा सिबिल स्कोअरची भानगड काय आहे.तो स्कोअर वाढवण्यासाठी कशी घ्यायची काळजी..
सिबिल स्कोअर हा ३०० ते ९०० च्या दरम्यान गणला जातो. ३०० हा सर्वात कमी तर ९०० हा सर्वात चांगला सिबिल स्कोअर असल्याचं दर्शवतो. सिबिल स्कोअर चांगला असणे याचा अर्थ असा होतो की, तुमची क्रेडिट हिस्ट्री चांगला आहे आणि तुम्ही कर्जाची परतफेड किंवा क्रेडिट कार्ड पेमेंट योग्य वेळेत करत आहात. बँकिंग किंवा वित्तीय संस्थांमध्ये सिबिल स्कोअरला खूपच महत्व आहे. ७५० किंवा त्यापेक्षा अधिक सिबिल स्कोअर चांगला मानला जातो.
हा स्कोर तुम्ही विविध बँका,संस्थात केलेल्या मागील काही वर्षातील व्यवहार बघून ट्रान्स युनियन सिबिल लिमिडेटद्वारे सिबिल स्कोअर तयार केला जातो. याला पूर्वी क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड म्हणून ओळखले जात होते.नावात बदल करून आता ट्रान्स युनियन असे केले आहे.
तुम्हाला गृह कर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज, क्रेडिट कार्ड घ्यायचे असल्यास बँकांकडून सिबिल स्कोअर तपासला जातो त्यामुळे सिबिल स्कोअर चांगला ठेवण्यासाठी आपली अगोदरची कर्जे वेळेत फेडणे महत्वाचे आहे. सिबिल स्कोअर हा आपल्या व्यवहारातील क्रेडिट हिस्ट्रीचा एक अंकात्मक सारांश आहे जो तुमच्या मागील पेमेंट्सच्या ट्रॅक रेकॉर्ड दर्शवतो.मागील सर्व व्यवहारनुसार या स्कोरमध्ये चढ-उतार होत असतो.चांगला क्रेडिट स्कोअर मिळवण्यासाठी तुमचा क्रेडिट वापर हा एकूण उत्पन्नाच्या ३० टक्के इतक्यांपर्यंतच असावा.
सिबिल स्कोअर कसा असावा
जर तुम्ही बँका,फायनान्सकडून एखादं कर्ज घेतलं असेल किंवा क्रेडिट कार्डचा वापर केला असेल तर त्याचा हफ्ते वेळेवर भरले तर तुमचा सिबिल स्कोअर सुधारण्यास मदत होते.कर्ज थकीत गेल्या सिबिल स्कोर बिघडू शकतो.त्यामुळे नियमित कर्ज फेड महत्वाची असते.
आपल्या क्रेडिट स्कोअरचे पुनरावलोकन करा
आपल्या क्रेडिट अहवालात त्रुटी मुक्त राहण्यासाठी नियमित स्कोअरचे परीक्षण केले पाहिजे.जर आपल्याला रिपोर्टमध्ये काही चूक आढळली तर त्याचे पुनरावलोकन वेळेत दुरुस्त करावे.
मर्यादित वापर
आपल्या क्रेडिट मर्यादेपेक्षा जास्त खर्च करु नये आणि त्याची खात्री करुन घ्यावी. जर तुम्हाला सिबिल स्कोअर ७५० पर्यंत ठेवायचा असेल तर आपल्या क्रेडिट कार्ड मर्यादेच्या ५० टक्क्यांहून अधिक खर्च करणे टाळा.
७५० खाली स्कोर येऊ नये
आपला सिबिल स्कोर ७५० च्या पुढे चांगला असल्याचं मानलं जातं व विविध खाजगी,राष्ट्रीय व फायनान्स कंपन्याच्या व विविध कर्जे व वैयक्तिक कर्ज किंवा क्रेडिट कार्डसाठी पात्रता ठरवण्यास आपली मदत करतो. जर आपला सिबिल स्कोअर ७५० पेक्षा कमी असेल तर आपल्याला बँका किंवा एनबीएफसी यांच्याकडून कर्ज देण्यास टाळाटाळ होऊ शकते. तुम्ही कर्ज घेत असताना बँका किंवा वित्तीय संस्था तुमचा सिबिल स्कोअर तपासूनच पुढील कारवाई सुरू होते.
सिबिल स्कोअर वाढविण्यासाठी महत्वाच्या टिप्स
आपल्या सिबिल स्कोअरचे बघून घ्या,ऑनलाइन ही बघता ‌येतो, सिबिल स्कोअर ७५० च्या पुढे असल्यास तुम्हाला आवश्यक असलेले कर्ज मंजुर होण्यास मदत होते.सिबिल स्कोअर हा तुमच्या फायनान्स, बँकात केलेल्या व्यवहारातील क्रेडिट स्थितीबद्दल माहिती दर्शवतो. तुम्हाला आपल्या सिबिल स्कोअरचे माहिती हवी असल्यास तुम्ही तो तपासून घेऊ शकता.आपला सिबिल स्कोअर चांगला राहण्यासाठी आपल्या सर्व कर्जाचे किंवा क्रेडिट कार्डचे हफ्ते भरा, उशीरा व हप्ते देण्यास हालगर्जीपणा टाळा.अन्यथा त्याचा परिणाम तुमच्या सिबिल स्कोअरवर होतो.तुमचा सिबिल स्कोर खराब होण्याने आपली क्रेडिटवर परिणाम होऊ शकतो.त्यामुळे काळजी घेत रहावा..
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here