आटपाडीत पिस्तूलसह तीन काडतुसे जप्त | स्कॉर्पिओसह,दोघांना अटक 

0

सांगली जिल्ह्यात सातत्याने बेकायदा पिस्तूल बाळगण्यावर पोलीस सातत्याने कारवाई करत आहेत.तरीही पुन्हा पुन्हा सातत्याने नव्या घटना समोर येत आहेत.शनिवारी एलसीबीने दोघांना पकडत एक पिस्तूल, तीन काडतुसे जप्त केले आहेत.याप्रकरणी परशुराम रमेश करवले (वय २३, रा.साठेनगर आटपाडी, मूळ रा. कराड),रविराज दत्तात्रय गोरवे (वय १९, रा. महुद,ता. सांगोला, जि. सोलापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

 

हेही वाचा-नवऱ्यांचा नादचं खुळा,बायकोच्या वाढदिवसाला चक्क गौतमी पाटीलची लावणी

आटपाडी-आवळाई रस्त्यावर हि कारवाई करण्यात आली आहे.एका स्कॉर्पिओमधून
बेकायदा देशी बनावटीचे पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या दोघांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.स्कॉर्पिओ गाडीसह त्यांच्याकडून एक पिस्तूल, तीन काडतुसे असा साडेसात लाखांचा ऐवज जप्त
करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
सांगलीचे पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी अवैधरित्या शस्त्रे बाळगणाऱ्यांना पकडण्याचे आदेश दिले
आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सतीश शिंदे यांनी स्पेशल पथक तयार आहे.या पथकातील अधिकारी,
कर्मचारी आटपाडी तालुक्यात गस्त घालत
असताना आटपाडी-आवळाई रस्त्यावरील
गुरूकूल शाळेजवळ एका स्कॉर्पिओमध्ये संशयित दोघेजण पिस्तूल घेऊन फिरत‌ असल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाली.त्यानुसार पथकाने तेथे सापळा रचून गाडीतील दोघांना ताब्यात घेतले.
Rate Card
त्यांच्यासह स्कॉर्पिओची तपासणी केली असता त्यांच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्तूल, तीन काडतुसे सापडली आहेत. पिस्तूलाबाबत अधिक चौकशी केल्यानंतर गोरवे हा तेथे ते पिस्तूल खरेदी करण्यासाठी आल्याचे समोर आले आहे.त्यानंतर दोघांना स्कॉर्पिओ,पिस्तूल,काडतूसासह अटक केली आहे. त्यांच्याविरोधात करण्यात
आटपाडी पोलिस ठाण्यात आर्म अँक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा-दुचाकी-ट्रव्हलचा अपघात | ट्रॅव्हल्सचे चाक डोक्यावरून गेले,एकाचा जागीच मृत्यू

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे,आटपाडीचे निरीक्षक शरद मेंमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक संदीप शिंदे, उपनिरीक्षक विशाल येळेकर, सुनील जाधव, मच्छिंद्र बर्डे, अजय बेंद्रे, आयर्न देशिंगकर, संदीप पाटील, प्रकाश पाटील,सचिन कनप आदींच्या पथकाने हा छापा टाकत कारवाई करून संशयितांना अटक केली आहे.

हेही वाचा-रस्त्याचा वाद विकोपाला,काकाचा पुतण्याने केला धारदार शस्ञाने खून | बेंळकीतील घटना

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.