जत : पोलिस ठाण्यासमोरील टॉवर चढलेल्या पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून जत न्यायालयाने त्याला ६ दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.चांदसाब आदमसाब शिवनगी (वय ३५, रा. हिंचगीरी, ता. इंडी जि.विजयपुर,राज्य कनार्टक)असे कोठडी सुनावलेल्या संशयिताचे नाव आहे.
दिग्विजय चव्हाण यांच्या रुपाने बाजारसमितीत डफळापूरच्या भूमिपुत्राचे संचालक पद निश्चित !
अधिक माहिती अशी,आज दिनांक २४ मार्च रोजी ११.०० वाजण्याच्या सुमारास चांदसाब शिवनगी यांने जत पोलीस ठाण्यात येवून माझी पत्नी नांदणेस माझ्याकडे येत नाही, तुम्ही तक्रार घेवून तिला जेल मध्ये टाका’असे म्हणून पोलीस ठाणे आवारातील वायरलेस टॉवरवर चढून स्वतःचा जिव धोक्यात घालून जिवाचे बरेवाईट करणेची धमकी देत होता.
सदर इसमास जत पोलीस ठाणेकडील पोलीस अधिकारी यांनी समुपदेश करुन वायरलेस टॉवर वरुन खाली उतरविले.महिला पोलीस उपनिरीक्षक राजश्री गायकवाड यांनी त्याचेवर फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १५१(३) प्रमाणे कारवाई करुन त्यास न्यायदंडाधिकारी जत यांचे कोर्टात हजर केले असता मा.न्यायालयाने त्यास दिवस न्यायालयीन कोठडीत रवाना केले आहे.