जतच्या कुणीकोणुरमध्ये मायलेकीचा गळा आवळून खून 

0
18

जत तालुक्यातील कुणीकोणूर मध्ये संशयावरून पत्नी व १४ वर्षाच्या मुलीचा गळा आवळून खून करण्यात आल्याचा प्रकार सोमवारी उघडीस आला आहे.या घटनेने जत तालुक्यात एकच खळबळ उडाली.जतच्या दक्षिण भागातील कुणीकोणूर ते सनमडी रोडवर असलेल्या बेळंखी वस्ती येथे ही ह्रदयद्रावक घटना घडली.

दिग्विजय चव्हाण यांच्या रुपाने बाजारसमितीत डफळापूरच्या भूमिपुत्राचे संचालक पद निश्चित !

पतीनेच संशयावरुन खून केला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलीसाकडून वर्तवला जात आहे.आई प्रियंका बिराप्पा बेंळुखी (वय-३२) व मुलगी मोहीणी बिराप्पा बेंळुखी (१४) असे मृत मायलेकीची नावे आहेत.बिराप्पा पत्नी प्रियंकाला खाली पाडून दोरीने गळा आवळताना मुलीने सोडविण्याचा प्रयत्न केला. तिला ढकलून जोराने गळा आवळल्याने जागीच तिचा मृत्यू झाला. त्यानंतर मुलगी खुनाची वाच्यता करेल या भितीने त्याने मोहिनीचाही गळा आवळून खून केला.

बाजार समितीतील भ्रष्ट कारभार रोकण्यासाठी बळीराजा पँनेलच्या उमेदवारांना विजयी करा | – महादेव हिंगमिरे

रविवारी मध्यरात्री संशयावरुन पतीनेच प्रियंका, मोहीणी या मायलेकीचा गळा आवळून हत्या केल्याचे समोर आले आहे. कुणीकोणूर ते सनमडी रोडवर असलेल्या बेळंखी वस्ती येथे राहणाऱ्या बेराप्पा बेळंखी यांच्या घराजवळील झोपडीत ही घटना घडली आहे.या घटनेची वर्दी पोलिस पाटील तानाजी कृष्णदेव पाटील यांनी उमदी पोलिसांत दिली आहे.
ग्रामस्थांनी शोधाशोध केली. दोन्ही मायलेकीचा मृतदेह झोपडीत आढळून आले. ही घटना संशयास्पद असल्याने पोलिस पाटील तानाजी कृष्णदेव पाटील यांनी उमदी पोलिस ठाण्याला माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच उमदी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार पथकासह घटनास्थळी पोहचले असून अधिक तपास सुरू आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here