जत(राजू माळी) : संख (ता. जत)येथे कोरोनाचा प्रभाव किती प्रमाणात आहे,या अनुषंगाने संख येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या वतीने सुपर स्प्रेडर अँटीजन टेस्टींग अतर्गंत 75 जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली.त्यात एकही बाधित आढळलेला नाही.त्यामुळे संखकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांच्या आदेशानुसार संख प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने डॉ.स्नेहल सावंत
यांच्या मार्गदर्शनखाली पथक नेमण्यात आले होते.
संखमधिल शिवाजी चौक येथील सर्व दुकान चालक व विना मास्क फिरणाऱ्या व वाहनधारकांचे अँन्टीजेन टेस्ट घेण्यात आली.संखसह अंकलगी, पांढरेवाडी, पाडोंझरी, मोटेवाडी, तिकोंडी येथील आलेल्या 75 जणांची अँन्टीजन टेस्ट केली आहे, त्यापैकी सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
कोरोना रूग्णाचे संख्यात वाढ होत असल्यामुळे व संख येथे दैनंदिन वस्तू खरेदी विक्री करण्यासाठी ये-जा करणाऱ्यांची संख्या जास्त असल्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढ होऊ नये,म्हणून दक्षता घेण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत हि मोहिम राबविण्यात आली.यावेळी रेश्मा बालगांव, सुनिल गडदे,पोलिस नागेश खरात उपस्थित होते.
डॉ.स्नेहल सांवत म्हणाल्या,संख प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरातील कोरोना संसर्ग नियत्रणांत आहे.सातत्याने रुग्णांची संख्या कमी होत आहे. आम्ही सर्व प्रकारे दक्ष आहोत.नागरिकांनी कोरोना संपला असे न समजता खबरदारी घेण्याची गरज आहे.मास्क,सोशल डिस्टसिंग पाळावेत.
संरपच मंगलताई पाटील म्हणाल्या,गाव आम्ही केलेले नियोजन योग्यवेळी बंद,गर्दीवर नियंत्रण,नागरिकात केलेली जागृत्ती यामुळे कोरोनाचे संकट मोठ्या प्रमाणात रोकू शकलो आहेत.त्यांचे फलित आता रुग्ण जवळपास अपवादाने आढळून येत आहे.ग्रामपंचायत, आरोग्य,महसूल विभागाच्या संयुक्त प्रयत्नाने कोरोनाचा संसर्ग आटोक्यात यश आले आहे. पुढेही नागरिकांनी शासनाचे नियम काटेकोर पाळावेत