जत : जत,कवठेमहांकाळ सह सांगली जिल्ह्यात आता महामार्गाचे जाळे विस्तारत आहे.त्यामुळे या महामार्गावरील वाहतुक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी आणि अपघातग्रस्तांना तातडीची मदत उपलब्ध करुन देण्यासाठी स्वंतत्र पोलीस यंत्रणेची आवश्यकता होती.त्याची दखल घेत कवठेमहांकाळ, बोरगाव (बोरगाव टोल नाका) येथे महामार्ग पोलीस सहाय्यता केंद्र स्थापन करण्यात आले आहे,अशी माहिती केंद्राचे सहा.पोलीस निरिक्षक अतुल लोखंडे यांनी दिली आहे.
यापुढे राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्गावर आमचे पथक गस्त घालण्याकरिता तसेच प्राणाकिंत, गंभीर अपघात व इतर अपघात यांना आळा घालणे व अपघातग्रस्ताना तात्काळ मदत पुरवून रस्ता रस्ता सुरळीत करून देण्यासाठी प्रयत्न करील,तसेच वाहतुक नियमन करणे आणि वाहतुक शिस्त पालनाकरिता वाहनकांवर नजर ठेवेल.महामार्गावर २४ तास सुरळीत वाहतूक सुरू राहिल हे महामार्ग पोलीस सहाय्यता केंद्र स्थापन करण्यात आले आहे,असेही लोंखडे म्हणाले.