वैरण आणायला गेलेल्या दोघा भावांचा बुडून मृत्यू | कुठे घडली घटना वाचा सविस्तर
सांगली : वैरण आणण्यासाठी वारणा नदीकाठी गेलेल्या दोघा भावाचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना शनिवारी उघडीस आली आहे.वा ळवा तालुक्यातील तांदुळवाडी येथे ही घटना घडली आहे.
ही घटना शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली होती. आज शनिवारी सकाळी दोघांचे मृतदेह नदीपात्रात आढळून आले आहेत.अमोल प्रकाश सुतार (वय १६, रा. तांदुळवाडी) व रविराज उत्तम सुतार (वय १२ रा. सदाशिवगड, राजमाची, ता. कराड, जि. सातारा) अशी या दोघा दुर्देवी मावस भावांची नावे आहेत.दोघा सख्या मावस भावांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.