एसटीच्या कालबाह्य झालेल्या बसेस बदलण्याची गरज

0
1
 
जत : दररोज एसटी बसेसचा कुठे ना कुठे अपघात होत आहेत, तर काही ठिकाणी या एसटी बस रस्त्यात कुठेही बंद पडत आहेत.राज्यभर ‌सातत्याने अपघात घडत आहेत.अनेकांना जणांना जीव गमवावा लागला. वारंवार होणाऱ्या अपघातांच्या घटनांतून एसटी महामंडळाने काहीतरी शिकावं अशी अपेक्षा होती. मात्र, जिल्ह्यातील आगारातील अनेक बसेस भंगार झाल्या असूनही त्या बिनधास्तपणे रस्त्यावर उतरविल्या जात आहेत.
धोकादायक बसेसमध्ये प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. प्रवास करताना कधी काय होईल हे सांगता येत नाही.भंगार झालेल्या बसेस रस्त्यावर बिनदिक्कतपणे धावतात हा प्रवाशांच्या जीवाशी खेळ खेळण्याचा गंभीर प्रकार आहे. या प्रकाराकडे परिवहन विभागाचे विभागीय नियंत्रण अधिकारी पूर्णपणे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. यांत्रिक व तांत्रिक विभाग यावर काहीही बोलायला तयार नाहीत. सरकारने महिलांना तिकीट दरात सवलत दिल्याने एसटीला प्रवाशांची प्रचंड गर्दी दिसून येत आहे. मात्र, सध्या बहुतांश बसेस भंगार अस्वस्थेत आहेत.
जून्या बसेसमुळे नेहमीचा मार्गावरील प्रवासाला जास्त ‌वेळ लागत असल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.प्रवाशांनी वाहन चालक आणि वाहकाकडे तक्रार केली असता यावर आमचा नाईलाज आहे, असे चालक आणि वाहकानी सांगितले.
एकूणच अशा प्रकारच्या भंगार बसेसमध्ये प्रवास करणे किती जिकरीचे झाले आहे, हे यावरून स्पष्ट होतं आहे. राज्य सरकारने याकडे लक्ष देऊन राज्यातील एसटी भंगार बसेस काढून टाकाव्यात आणि नवीन बसेस द्याव्यात, अशी मागणी प्रवाशी संघटनेने केली आहे.एकीकडे एसटीने प्रवाशांची संख्या वाढविण्याकरता सवलतीचा सपाटा लावला आहे. तर दुसरीकडे लालपरीच्या तांत्रिक बाबीकडे दुर्लक्ष करत प्रवाशांच्या जीवाशी खेळत आहे. प्रवाशांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार एसटी महामंडळाकडून त्वरित बंद व्हावा अशी मागणी होत आहे.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here