सांगली शहरातील मार्केट यार्डजवळ रिलायन्स ज्वेल्स नावाचे सोन्या-चांदीचे मोठे शोरूम आहे.रविवारी दुपारी तीनच्या आसपास ग्राहक म्हणून पाच ते सहा दरोडेखोर शोरूम शिरले.दरोडेखोरांनी तोंडाला मास्क लावला होता.रिव्हाॅल्वरचा धाक दाखवित दरोडेखोरांनी कर्मचाऱ्यांना बांधून घातले.यात महिला कर्मचाऱ्यांचाही समावेश होता.काही ग्राहकांनाही दरोडेखोरांना धमकी दिली. ज्वेल्सच्या व्यवस्थापकाला मारहाणही केल्याचे समजते.दरम्यान कर्मचाऱ्यांना बांधून घालताच दुकानाच्या शोकेसमधील सोने-चांदीचे दागिने सोबत आणलेल्या बॅगेत भरून पळवून नेहले आहेत.दरम्यान शोरूममधिल एका ग्राहकाने दरोडेखोराशी वाद घातल्यानंतर त्याच्यावर दरोडेखोरांनी गोळीबार केल्याचे सांगितले जात आहे.
शोरूममध्ये एक काडसूत पडलेली होती.शोरूममधिल फर्निचरच्या काचाही फुटलेल्या आहेत.सोने-चांदीची लुट करून दरोडेखोर सफारी गाडीतून पळाले आहेत.तब्बल तासभर शोरूममध्ये दरोडेखांनी चोरी केल्यानंतर दरोडेखोरांनी सीसीटीव्हीचा डीसीआरही सोबत नेहल्याचे समजते.माहिती मिळताच पोलिसांचा फौजफाटा दाखल झाला असून पोलीसांनी पथके नेमत दरोडेखोरांचा तपास सुरू केला आहे.