बोरगाव टोलनाक्यावर कार उलटली,१५ जण जखमी

0
3
शिरढोण: पहाटे गाडी चालविणे प्रवाशांना पहाटेचा प्रवास चांगलाच महागात पडला असून चालकाला चालत्या गाडीवरचं डुलकी लागल्याने कार टोल नाक्यावर जाऊन उलटली. या अपघातात पंधरा जण गंभीर जखमी झाले.रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव ता.कवठेमहांकाळ येथे शनिवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली आहे.जखमीमध्ये कर्नाटकातील निपाणी व इचलकरंजी येथील ५ जण तर, कोल्हापूरातील २ दोघांचा समावेश आहे.
अपघाताबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की,कर्नाटकातील निपाणीहून पंढरपूरच्या विठ्ठलाच्या देवदर्शनासाठी शनिवारी पहाटे कारमधून भाविक निघाले होते.रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव टोल नाक्यावर चालकाला अचानक झोपेची डुलकी लागली.त्यामुळे त्याचा गाडीवर ताबा सुटल्याने गाडी थेट टोल नाक्याच्या डीवायडरला धडकून उलटली. या अपघातात एकूण १५ जण गंभीर जखमी झाले आहे.

जखमींना उपचारासाठी मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.गाडी़चे पलटी झाल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.कवठेमहांकाळ पोलिसात अपघाताची नोंद करण्याचे काम सुरू असून अधिक तपास पोलिस करीत आहेत.पहाटेच्या प्रवासादरम्यान नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे,हे या घटनेवरून समोर आले आहे.विशेष म्हणजे हे अन्य ठिकाणी झाले असतेतर मोठी दुर्घटना घडली असती,त्यामुळे चालकांनी धोका घेऊ नये.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here