डफळापूर : श्रीपती शुगर ॲण्ड पाँवर लिमिटेड, डफळापूर या साखर कारखान्याने येणाऱ्या गळीत हंगाम २०२३-२४ साठी तोडणी वाहतूक करार पूर्ण केलेले असुन तोडणी वाहतूक कंत्राटदारांना अँडव्हान्स वाटप सुरुवात केल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री. महेंद्र आप्पा लाड यांनी दिली आहे.मागील चाचणी हंगामातच कारखाना शेतकऱ्यांच्या व प्रशासनाच्या विश्वासास पात्र ठरला आहे.
येणाऱ्या गळीत हंगाम २०२३-२४ साठी तोडणी वाहतूक करार पूर्ण केलेल्या तोडणी वाहतूक कंत्राटदारांना आज तोडणी वाहतूक अँडव्हान्स रक्कमेचे धनादेश वाटप करण्यात आले.आगामी काळामध्ये शेतकऱ्यांनी ऊसाचे उत्पादन व साखर उतारा अधिक देणाऱ्या ऊसाच्या जातीची लागवड आपल्या शेतामध्ये लागवड करण्याचे आवाहन कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री. महेंद्र आप्पा लाड यांनी केले आहे.
कारखान्याने येणाऱ्या हंगामात ५ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उदिष्ट्य ठेवले असुन आधिकाधिक ऊस श्रीपती शुगरला देऊन सहकार्य करावे अशी भावना त्यांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांच्या उत्कर्षात श्रीपती शुगर नेहमीच अग्रेसर राहील असेही त्यांनी सांगितले. सदर कार्यक्रमास मा. आमदार विक्रमसिंह सावंत,चंद्रशेखर सावंत,धैर्यशील सावंत,सरपंच सुभाष गायकवाड, कुडनूर गावचे
सरपंच, रामपूर गावचे सरपंच मारुती पवार, माजी सरपंच अज्ञान पांढरे,जनरल मॅनेजर महेश जोशी, शेती अधिकारी हनमंत धरीगौडा, पर्यावरण अधिकारी अशोक सूर्यवंशी,एच.आर. मॅनेजर रणजीत जाधव, इलेक्ट्रिक
इंजिनिअर आनंदा कदम, सिव्हील विभागाचे श्रीधर पाटील, सर्व अधिकारी,कर्मचारी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.