अभियांत्रिकी प्रवेशासाठी लागणाऱ्या MHT-CET परीक्षेचा निकाल जाहीर झाला. आता निकालानंतर अभियांत्रिकी क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना पडलेला महत्वाचा प्रश्न म्हणजे कोणती अभियांत्रिकी शाखा आणि कोणते कॉलेज निवडावे? महाराष्ट्रात आज जवळपास ३३० अभियांत्रिकी कॉलेज आणि ४० पेक्षा जास्त अभियांत्रिकीच्या शाखा उपलब्ध आहेत. मग यामधून नक्की कोणती शाखा आणि कोणते कॉलेज निवडावे? हा लेख नक्कीच आपल्या या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी मदत करेल.
आजकालच्या बदलत्या प्रवाहासोबत टिकून राहण्यासाठी योग्य अभियांत्रिकी शाखा आणि कॉलेज निवडताना खालील गोष्टींचा विचार करावा:
१. विद्यार्थ्याची आवड आणि कल:
सामन्यात: कोणतीही शाखा आणि कॉलेज निवडताना विद्यार्थ्याची आवड आणि पालकांची भूमिका या दोन गोष्टी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावतात. आजकाल सर्वत्र सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग शाखेची मागणी जोरात आहे. त्यामुळे बरेच पालक आपल्या पाल्याची आवड आणि कल विचारात न घेता त्यांना या शाखेत प्रवेश घेण्यास प्रवृत्त करतात. परंतु असे न करता पालकांनी आपल्या पाल्याशी मनमोकळेपणाने बोलून त्याची आवड आणि कल विचारात घेऊन त्यासाठी अभियांत्रिकी मधील योग्य शाखा निवडावी.
२. भविष्यातील रोजगार आणि व्यवसाय संधी:
आज कोणत्या शाखेला जास्त मागणी आहे याचा विचार न करता भविष्यात कोणत्या शाखेला जास्त मागणी आणि संधी असेल याचा विचार करून विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी शाखा निवडावी. येणारा काळ हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स, ऑटोमेशन
३. कॉलेजची मान्यता आणि संलग्नता:
अभियांत्रिकी कॉलेज निवडताना त्या कॉलेजला AICTE (अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद) यांची मान्यता आहे का हे तपासून घ्यावे. तसेच कॉलेजची संलग्नता ही UGC (विद्यापीठ अनुदान आयोग) मान्यताप्राप्त विद्यापीठाशी आहे का याची माहिती घ्यावी जेणेकरून नोकरी मिळवताना किंवा परदेशात शिक्षणासाठी प्रवेश मिळवताना कोणतीही अडचण उद्भवणार नाही.
४. कॉलेजमधील सोयी सुविधा:
आपण निवड केलेल्या कॉलेजमध्ये अनुभवी आणि संशोधनाभिमुख शिक्षक, सुसज्ज प्रयोगशाळा आणि ग्रंथालय, संगणक सुविधा, इत्यादी गोष्टी आहेत का याची खात्री करावी. तसेच कॉलेजने नामंकित कंपन्यांसोबत केलेले सामंजस्य करार, त्यातून विद्यार्थ्यांना होणारा फायदा, कॉलेजमध्ये उपलब्ध असलेले इनोवेशन आणि इन्कूबेशन सेंटर, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणारे उपक्रम यांची देखील माहिती घ्यावी. या सर्व गोष्टी विद्यार्थ्यांना वास्तविक जगासोबत जोडतात आणि नोकरी मिळवण्यासाठी मदत करतात. शक्य असेल तर त्या कॉलेजमधील आजी आणि माजी विद्यार्थ्यांशी संवाद साधून आपण निवडत असलेल्या कॉलेजबद्दल अधिक माहिती घ्यावी.
५. कॉलेजमधील विद्यार्थ्यांचे प्लेसमेंट रेकॉर्ड (रोजगार संधी):
आपण निवडलेल्या शाखेमधील विद्यार्थ्यांसाठी त्या कॉलेजमध्ये किती आणि कोणत्या कंपनी येतात, त्यांनी दिलेले सरासरी वार्षिक पॅकेज, त्या कंपनीमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या या सर्व गोष्टी त्या कॉलेजच्या गुणवत्तेवर शिक्कामोर्तब करतात.
तरी सर्व विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी वरील सर्व गोष्टी विचारात घेऊन अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण झालेनंतर नोकरी करायची की पदव्युत्तर शिक्षण घ्यायचे याबद्दल निर्णय घेऊन योग्य ती अभियांत्रिकी शाखा आणि कॉलेज निवडावे.
लेखक:
प्रा. स्वप्निल ठिकणे,
अधिव्याख्याता- मेकॅनिकल इंजिनीअरिंग,
संजय घोडावत इन्स्टिट्यूट, अतीग्रे.