सोन्याळ : जत तालुक्याच्या पूर्व भागात दोड्डनाला तलावातील पाण्याची पातळी खालावली असल्याने दोड्डनाला तलावावरती अवलंबून असणाऱ्या गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.निगडी तांडा (ता.जत) येथील दोड्डनाला तलावातून उमदी, उटगी, सोन्याळ व जाडरबोबलादसह अन्य गावांना पाईपलाईन द्वारे पाणीपुरवठा केला जातो. मात्र दोड्डनाला तलावातील पाण्याची पातळी खालावल्याने व पाऊस नसल्याने पिण्याच्या पाण्याची मोठी अडचण निर्माण झाली आहे.
अनेक गावात तीन-चार दिवसाआड पाणी सोडले जात आहे. त्यामुळे प्रत्येक गावातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. प्रशासनाने याकडे तत्काळ लक्ष देऊन नागरिकांची पाण्यासाठीची भटकंती थांबवावी अशी मागणी युवा नेता चन्नाप्पा नंदूर यांनी केली आहे. म्हैसाळ योजनेतून आलेल्या बंदिस्त पाईपलाईन द्वारे संपूर्ण तलाव भरून मिळावा. तसेच तलावातून होत असलेला पाणी उपसा थांबवून संबंधित शेतकऱ्यांवर प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी युवा नेता चन्नप्पा नंदूरआहे.
ReplyForward
|