कवठेमहांकाळ : नॅशनल हेल्थ लॉ रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित नुतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज,IIT मेडिकल अकॅडमी नरसिंहगाव च्या JEE बॅच २०२१-२२ मधील स्नेहल चंद्रकांत चव्हाण या विद्यार्थिनीने JEE Advance ऑल इंडिया रँक १८३४ मिळवून उत्तुंग यशाची बाजी मारली आहे. संस्थेच्या अध्यक्षा डॉ. नुतन माळी सचिव डॉ. रामलिंग माळी, प्राचार्य तात्यासो माने यांनी तिचे अभिनंदन केले.
कवठेमहांकाळ सारख्या ग्रामीण भागामध्ये संस्थेची उभारणी करून डॉ. नुतन माळी व डॉ. रामलिंग माळी यांनी व्यवसायिक शिक्षणाची दिशा देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान सर्व सुविधा नियुक्त कॅम्पस तसेच तज्ञ व अनुभवी शिक्षक स्टाफ उपलब्ध करून कवठेमहांकाळ तालुक्यामध्ये नवीन परंपरेची सुरुवात करून दिली. स्नेहलच्या यशाने अनेक ग्रामीण विद्यार्थ्यांना यातून स्फूर्ती व प्रेरणा मिळेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.