सांगलीत पब्लिक ट्रस्ट ऑडिटर्स असोसिएशनची स्थापना | डफळापूरचे सतिश भोसले अध्यक्षपदी

0
2

सांगली : धर्मादाय संस्थांच्या लेखापरीक्षणाचे काम करणाऱ्या लेखापरीक्षकांच्या हितासाठी पब्लिक ट्रस्ट असोसिएशन या संस्थेची स्थापना करण्यात आली असून धर्मादाय विभागाने तसे प्रमाणपत्र दिले आहे.जिल्ह्यामध्ये सुमारे वीस हजार धर्मादाय संस्था आहेत. यामध्ये शैक्षणिक, सामाजिक, महिला मंडळे व मंदिर आस्थापनेचा समावेश आहे.

या संस्थांचे लेखापरीक्षण करण्यासाठी धर्मादाय विभागाने यापूर्वीच पॅनेल नियुक्त केलेले आहे. या पॅनेलमधील लेखापरीक्षकांच्या सोडविण्यासाठी यापूर्वी संस्था नव्हती.म्हणून सतीश भोसले यांच्या पुढाकारातून या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे.अध्यक्षपदाचा पहिला बहुमानही भोसले यांनांच सर्वानुमत्ते देण्यात आला आहे.

 

धर्मादाय कार्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक रत्नदीप पाटणकर यांच्याहस्ते नोंदणी प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी सतीश भोसले,समीर लतीफ, मुराद पटेल, हेमंत दोशी, राजेंद्र माने, संदीप पाटील,दीपक खोत आदी यावेळी उपस्थित होते.

डफळापूरचे सतिश भोसले अध्यक्षपदी

या असोसिएशनच्या अध्यक्षपदी सतिश विठ्ठल भोसले यांची तर समीर अब्बास लतीप यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.इतर कार्यकारी अशी सचिव हेमंत विर्चंद दोशी,खजिनदार राजेंद्र बाबासाहेब माने,सदस्य संदिप आण्णा पाटील,दिपक महावीर खोत,मुराद शमशुद्दीन पटेल अशी कार्यकारी निवडण्यात आली आहे.दरम्यान सतिश भोसले यांच्याकडे को ऑपरेटिव्ह संस्थाच्या ऑडीटर असोसिएशनचे अध्यक्ष पदही आहे.अशी दोन्ही असोसिएशनची पदे असणारे भोसले एकमेव आहेत.त्याचबरोबर को ऑपरेटिव्ह संस्थाच्या ऑडीटर असोसिएशन राज्याच्या सचिव पदाची जबाबदारही भोसले यांच्याकडे आहे.

 

 

 

सांगलीत पब्लिक ट्रस्ट ऑडिटर्स असोसिएशनचे नोंदणीचे प्रमाणपत्र सतिश भोसले यांच्याकडे देताना धर्मादाय कार्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक रत्नदीप पाटणकर
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here