सांगली : कृषी आयुक्तालय व अधिनस्त विभागीय कृषी सहसंचालक यांच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट-क संवर्गातील वरिष्ठ लिपीक, सहाय्यक अधीक्षक, लघुटंकलेखक, लघुलेखक (निम्न श्रेणी), लघुलेखक (उच्च श्रेणी) या संवर्गातील पदांसाठी सरळसेवेने पदभरतीसाठी ३ एप्रिल २०२३ ते ६ एप्रिल २०२३ या कालावधीमध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीस अनुसरुन अर्ज करण्यासाठीचा अंतीम दिनांक ३० एप्रिल, २०२३ असा होता.
या जाहिरातीसाठी अर्ज करु न शकलेल्या उमेदवारांसाठी दि. १३ ते दि. २२ जुलै २०२३ या कालावधीतwww.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज प्रणाली खुली करण्यात येणार आहे. जाहिरातीतील नमूद केलेल्या वय, शैक्षणिक अर्हता, अनुभव, पात्रता, परीक्षा शुल्क इतर सर्व संदर्भातील अटी व शर्ती कायम राहतील, याची नोंद घ्यावी, असे आवाहन कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी केले आहे.