सांगलीतील निरंकारी नारी संत समागमास दिला गेला शांती सुखाचा संदेश 

0
सांगली : निरंकारी सत्संग मध्ये आल्यावर जीवनामध्ये शांतीसुखाची प्राप्ती होते,असा संदेश मुंबईहून आलेल्या निरंकारी प्रचारिका श्रीमती मंदाताई बोडके यांनी दिला.संत निरंकारी सत्संग भवन, सांगली येथे दिनांक ९ जुलै रोजी आयोजित जिल्हा स्तरीय नारी संत समागमात मुख्य मंचा वरून बोलत होत्या. या समागमा मध्ये संपूर्ण सांगली जिल्ह्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील निरंकारी महिला भक्तांनी मोठ्या संख्येने भाग घेतला.

 

त्या पुढे म्हणाल्या, की या जगात जीवनामध्ये सुख प्राप्त व्हावे म्हणून मनुष्य अनेक प्रकारची कर्मे आचरत असतात. जीवनात सुख यावे म्हणुन मनुष्य अहोरात्र आपली काया झिजवत आहे. पण खऱ्या अर्थाने जीवनामध्ये सुख शांती यायची असेल तर अध्यात्म्याची गरज आहे. जगामध्ये सुसंस्कारित नवीन पीढी तयार व्हायची असेल तर प्रत्येक माता भगिनी यांनी निरंकारी मिशनची शिकवण अंगिकारणे आवश्यक आहे. तरच जीवनात शाश्वत सुख येईल आणि मानवाकडून मानवतेचे पालन होईल व विश्वामध्ये खरी खुरी शांतता स्थापित होईल.

 

त्यापुढे म्हणाल्या की संत मुक्ताबाई, संत मिराबाई यानी सत्संगचे महत्त्व सांगितले आहे. अहिल्या, मंदोदरी, कुंती, द्रोपदी, सीता यांना पतिव्रता म्हणून नावलौकिक प्राप्त झाला. याचे कारण त्यांची एकनिष्ठता आणि पूर्ण समर्पण हेच आहे. आपणही जेव्हा ईश्वराची प्राप्ती करून निष्ठेने भक्ती करतो तेंव्हा आपलेही जीवन आदर्श बनते.  प्रपंच करत असतानाच संताच्या सहवासामध्ये राहुन या विश्वामध्ये सर्वत्र व्यापक निर्गुण निराकार असलेल्या परमात्म्याचे गुणानवाद करणे हीच यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली होय.सत्संग मध्ये आल्यानंतर अनेक यज्ञाचे फळ प्राप्त होते संत दर्शनाला जर जायचे असेल तर आपल्या मनातील अहंकार त्यागला पाहिजे सत्संगमध्ये आल्यावर मनपरिवर्तन होते, मनातील अवगुण दूर होतात.शेवटी त्या म्हणाल्या, की आत्म्याची तृप्ती परमात्म्याच्या मिलना शिवाय होऊ शकत नाही. वर्तमान निरंकारी सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज ब्रह्मज्ञानाद्वारे आत्मा आणी परमात्म्याची ओळख करून देऊन खऱ्या भक्तीची युक्ती समजावतात.
सांगली नारी सत्संग प्रबंधक उमा कराजगार यांनी स्वागत व धन्यवाद व्यक्त केले. केले कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मायावती काळे व पूनम महाडिक यांनी केले सत्संग समाप्तीनंतर ५० जिज्ञासू भगिनीनी ब्रह्मज्ञानाची प्राप्ती केली. कार्यक्रमाचे उत्तम नियोजन सांगली, खानापूर व वाळवा संयोजक यांचे मार्गदर्शना खाली सेवादल माता भगिनी व अन्य स्वयंसेवक यांनी केले.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.