जत : जत तालुक्यातील विविध मागण्यांसाठी क्रांती दिनी नऊ ऑगस्ट रोजी जत-उमदी रोडवरील सोन्याळ फाटा येथे सकाळी अकरा वाजता चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
प्रांताधिकारी यांना दिलेल्या निवेदनात तुकाराम बाबा महाराज यांनी नमूद केले आहे की, जत तालुक्यातील पूर्व भागातील वाहतुकीच्या दृष्टिकोनातून ,दळणवळणाच्या साधनांचा विचार करता महत्वाचा असणारा जाडरबोबलाद ते जिल्हा हद्द मारोळी या मार्गाची दुरावस्था झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. रस्त्याला दुतर्फा काटेरी झुडपानी वेढले आहे. देशाला स्वतंत्र मिळून पच्चाहत्तर वर्ष पूर्ण झाली. आपण अमृत महोत्सवी वर्ष म्हणून साजरे केले जिल्हा मार्गाची अवस्था पाणंद रस्त्यासारखी ही बाब विचार करण्यासारखी आहे. इतर जिल्हा मार्ग असल्याने या मार्गावर कायम वर्दळ असते. विद्यार्थ्यांना सायकल असूनही चालत जावे लागत आहे. प्रवाशांची गैरसोय होत आहे तरी संबंधित विभागांनी या मार्गाचे डांबरीकरण करण्याची मागणी केली आहे।
तालुक्यातील लकडेवाडी – जाडरबोबलाद ते जिल्हा हद्द (मारोळी ), जाडरबोबलाद ते मारोळी, अंकलगी ते करजगी जुना रस्त्याचे डांबरीकरण करावे , तालुक्यात अपघाताचे प्रमाण वाढले आहे अनेक रस्त्यावर बेकायदेशीर विनापरवाना, रस्त्यावर चर काढणे खड्डे पाडणे , गतिरोधक करणे, यामुळे रस्त्याचे मोठे नुकसान होत आहे. तरी खड्डे मुक्त रस्ते करावेत, तालुक्यातील ग्रामीण व जिल्हा मार्गावरील काटेरी झुडपे संबंधित ग्रामपंचायत व विभागाने काढावेत, विजापूर ते तीर्थक्षेत्र पंढरपूर ला पायी जाण्याचा मार्ग(भाग सोन्याळ, गारळेवाडी- २) येथे रस्त्यालगत असलेली धोकादायक विहिरीमुळे सदरची वाहतूक बंद होत आहे सदरच्या विहिरीस संरक्षक भिंत बांधावी. या मार्गावरील बस ही बंद झाली आहे.
ती सुरू करावी , गुड्डापूर येथील धानम्मा देवी व मुचंडी येथील दरेश्वर या तीर्थक्षेत्रासाठी हजारो भावीक दर्शनासाठी माडग्याळ जाडर बोबलाद लकडेवाडी मार्गे जातात परंतु या रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे हा रस्ता त्वरित दुरुस्त करावा अशी मागणी तुकाराम बाबा यांनी केली पत्रकार परिषदेत केली.यावेळी संगप्पा चाणागोंड, आप्पासाहेब चौगुले, सकील मुल्ला, बापुराय खाकांडकी मोहन राजपूत, शिवाजी कोलकार, संतोष माळी, मलकप्पा उमराणी, महेश चडचण, बाळासाहेब आवजी, सिद्धू गुरव आदी उपस्थित होते
■ आंदोलनात सहभागी व्हा- तुकाराम बाबा
जतच्या पाण्याचा प्रश्न असो की रस्त्याचा, जतकरांसाठी श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटना कायम संघर्ष करत आहे. पाणी परिषद, पाण्यासाठी गावोगावी बैठका, जनजागृती मोहीम इतकेच नव्हे तर संख ते मुंबई मंत्रालय पायी दिंडी काढली, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मंत्र्यांना, प्रशासनातील अधिकाऱ्यांची भेट घेत जतच्या पण्यासाठी अविरत संघर्ष आजही सुरूच आहे. मागील महिन्यात जतमधील दुष्काळकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी धरणे आंदोलन केले. जतमधील रस्त्याची बिकट अवस्था झाली आहे, गावाकडे जाणारे रस्ते काटेरी झुडपाणी वेढली आहेत,रस्त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या गंभीर बाबीकडे लक्ष वेधून घेण्यासाठी रस्ता रोको करण्यात येत आहे. प्रशासनानाने वेळीच लक्ष न दिल्यास मानव मित्र संघटनेच्या वतीने आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे. क्रांती दिनी आयोजित आंदोलनात जतकरांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहन हभप तुकाराम बाबा महाराज यांनी पत्रकार परिषदेत केले.