जत पूर्व भागाला कर्नाटकातून लवकरचं पाणी मिळणार

0
जत : जत तालुक्याच्या सीमावर्ती भागातील पाण्याच्या प्रश्नासाठी तुबची-बबलेश्वर योजना महत्त्वपूर्ण ठरली आहे. या योजनेचे जनक आणि जतकरांच्या हितासाठी सदैव आग्रही असणारे कर्नाटक सरकारमधील मंत्री एम.बी.पाटील यांनी या योजनेद्वारे जत पूर्व भागाला मोठे सहकार्य केले आहे,अशी माहिती आमदार विक्रमसिंह सावंत यांनी दिली.

सध्या कमी असणारा पाऊस व विस्तारित म्हैसाळ योजनेला शासन स्तरावर होत असलेला विलंब यामुळे जत पूर्व भागाला मोठ्या प्रमाणात पाण्याची कमतरता जाणवू लागली आहे.यासाठी सदरच्या तुबची-बबलेश्वर योजनेतून पाणी मिळणे आवश्यक असल्याची बाब मंत्री एम.बी.पाटील यांच्याकडे गेल्या काही काळात व्यक्त केली होती आणि त्या पद्धतीने पाण्यासाठी निवेदने दिली होती.

यादृष्टीने सकारात्मकता दर्शवत त्यांनी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री व जलसंपदामंत्री डी. के. शिवकुमार यांचेकडे पत्राद्वारे तुबची-बबलेश्वर योजनेचे पाणी जतला देणेबाबतची मागणी केली असून लवकरच जत पूर्व भागाला पाणी मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. जत तालुक्यातील जनतेकरीता घेतलेल्या या निर्णयासाठी कर्नाटक सरकारमधील मंत्री एम.बी.पाटील यांचे तमाम जतकरांच्या वतीने आभार मानण्यात येत आहे.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.