वेळापत्रक आधीच ‘निश्चित’विशेष म्हणजे, ग्रामसभा कोणत्या महिन्यात किती तारखेला होणार, याचे पूर्वनियोजित वेळापत्रक सरकारला कळवावे लागणार आहे. त्यासाठी जीएस निर्णय अँप व्हायब्रंट ग्रामसभा पोर्टलशी जोडण्यात आला आहे.या पोर्टलवर ग्रामपंचायतीला आपल्या ग्रामसभांचे शेड्यूल आधीच नमूद करावे लागणार आहे. त्या वेळापत्रकानुसार घेतलेल्या ग्रामसभेतील निर्णय हे अँपवर अपलोड करावे लागणार आहेत.
सभेचा १५ मिनिटांचा व्हिडिओ रेकॉर्ड करावा लागणार !
आता हे अँप वापरून ग्रामसभेचा प्रत्येक निर्णय सरकारपर्यंत कसा पोचवायचा, यासाठी राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियानाचे प्रकल्प संचालकांनी सर्व जिल्हा परिषदांना पत्र पाठविले आहे. जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीला सूचना देण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत.अँपवर अशी होणार ग्रामसभाप्रत्येक ग्रामपंचायतीने ‘जीएस निर्णय’ हे मोबाईल अँप डाउनलोड करावे. ग्रामसभेतील प्रत्येक निर्णय स्पष्ट करणारा किमान दोन आणि कमाल १५ मिनिटांचा व्हिडिओ रेकॉर्ड करावा. प्रत्येक निर्णय दर्शविणारा व्हिडिओ अँपवर अपलोड करावा.त्यासाठी ई-ग्रामस्वराज पोर्टलचा यूजर आयडी व पासवर्ड वापरावा. हे व्हिडिओ अप्रूव्ह किंवा रिजेक्ट करण्याची जबाबदारी गटविकास अधिकाऱ्यांकडे असेल. अपलोड केलेल्या व्हिडिओंचा तिमाही अहवाल सरकारला सादर करावा लागणार आहे.