संख सोसायटीच्या चेअरमनपदी सामान्य कार्यकर्त्यांला संधी

0
संख : जत तालुक्यातील संख विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि.संख,चे नुतन चेअरमन पदी मैनूद्दीन बादशहा जमादार तर व्हा.चेअरमन पदी यल्लप्पा लालू बिरादार याची बिनविरोध निवड करण्यात आली.या वेळी निवडणूक निर्णय अधिकारी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था जत वर्ग १ चे श्री.अमोल डफळे यांच्या अध्यक्षेखाली निवड करण्यात आली.यावेळी सचिव मलगोंडा बिरादार उपस्थित होते.

 

माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बसवराज पाटील यांच्या नेतृत्व खाली श्री लायव्वादेवी शेतकरी  विकास परिवर्तन पॅनेल, संख सोसायटी पंचवार्षिक निवडणूकीत बाजी मारत विजय मिळवला होता.सोमवारी चेअरमन,व्हा.चेअरमन पदाची निवड प्रक्रिया पार पडली.यात चेअरमनपदी
मैनूद्दीन बादशहा जमादार,व्हा.चेअरमनपदी यल्लाप्पा लालू बिराजदार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.यावेळी संचालक सुभाषचंद्र बसवराज पाटील,रावसो विठ्ठल कोट्याळ,गणपती बसवंत बिराजदार, रामगोंडा लक्ष्मण बिराजदार,ज्ञानेश्वर विठ्ठल बिरादार,रेणुका शिवाप्पा कनमडी,पार्वती रामगोंडा जामगोंड, गुरुबसू दादू कदम,शिवय्या बसय्या जंगम,ईराप्पा कन्नूरे,आमगोंडा बिरादार उपस्थित होते.

याप्रसंगी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बसवराज पाटील नेतृत्वाखाली युवा नेते सुभाष पाटील,नूतन चेअरमन मैनूद्दीन जमादार व्हाईस चेअरमन यल्लाप्पा लालू बिराजदार साहेबराव टोणे,आय.एम बिरादार, कृषी उत्पन्न बाजार समिती चे संचालक दयगोंडा बिरादार,माजी सरपंच तुकाराम बिरादार,माजी चेअरमन मालिकार्जून सायगाव,विशवनाथ पाटील,राजेंद्र हलकुडे,माजी सरपंच सिदनिंगय्या जंगम,माजी प्रा.रामगोंडा फुटाणे सर,पोलीस पाटील सुरेश पाटील, कुमार पाटील, रमेश कनमडी,बसगोंडा बाबानगर,यांच्या सह सर्व ग्रामस्थ व सभासद उपस्थित होते.
आमचे नेते बसवराज पाटील, सुभाष पाटील यांनी माझी चेअरमनपदी निवड करून विश्वास दाखविला आहे.यापुढे सोसायटी कारभार पारदर्शी करून सभासदांच्या हिताचा कारभार करू, बँकेच्या नियमाच्या अधीन राहून वसूली,कर्ज वाटप ‌करून शेतकऱ्यांना आधार देण्याचा प्रयत्न करीन
– मैनूद्दीन जमादार
नुतन चेअरमन
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.