सांगली : ओबीसी ग्रामीण जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब खोत यांनी नजीर मुलाणी यांची ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष व ओबीसी शहर जिल्हाध्यक्ष अशोकसिंग रजपूत यांनी अख्तर पटेल यांची ओबीसी मिरज शहर अध्यक्ष यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी बुधगावचे माजी सरपंच सुरेश ओंकारे उपस्थित होते. तसेच सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सहचिटणीस पदी श्री. श्रीधर बारटक्के यांची नियुक्ती करण्यात आली. सदरच्या निवडीची पत्रे सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते देण्यात आली.
यावेळी अरुण पडसुळे, पैगंबर शेख, अण्णासाहेब खोत, प्रशांत देशमुख, अल्ताफ पेंढारी, अशोक रासकर, विक्रम कांबळे, अरूण गवंडी, बाबगोंडा पाटील, सुरेश गायकवाड, विश्वास यादव, नंदाताई कोलप, प्रतीक्षा काळे, कांचन खंदारे, नामदेव पठाडे, शैलेंद्र पिराळे, सिमा कुलकर्णी, शमशाद नायकवडी, कॉंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
—