डफळापूर, संकेत टाइम्स : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक अभिजीत चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त विविध परिक्षेत यश संपादन केलेल्या मुलांचे सत्कार करण्यात आले.त्याचबरोबर डफळापूर येथील जिल्हा परिषद शाळा नं १ व नं २,राजे विजयसिंह डफळे हायस्कूलमधिल विद्यार्थ्यांना वह्याचे वाटप करण्यात आले.
बाजार समितीचे संचालक अभिजीत चव्हाण हे सातत्याने सामाजिक उपक्रम राबवतात.गेल्या दोन दशकाहून जास्त काळ त्यांनी डफळापूर परिसरात सामजिक उपक्रम राबविले आहेत.प्रत्येक वाढदिवसाला दादा शालेय विद्यार्थ्याचे सत्कार,वह्याचे वाटप,विविध क्षेत्रात काम केलेल्या मान्यवरांचे गौरव करतात.यंदाही वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम राबविण्यात आले.परिसरातील विविध परिक्षेत यशस्वी विद्यार्थी,विविध स्तरावरील स्पर्धातील विजेते विद्यार्थ्याचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे सत्कार यावेळी करण्यात आले.तसेच जिल्हा परिषद शाळेसह,माध्यमिक शाळेत विद्यार्थ्यांना वह्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य दिग्विजय चव्हाण,सरपंच सुभाषराव गायकवाड,शंकर वगरे,मिरवाडचे माजी सरपंच आण्णासो चव्हाण,खलाटीचे सरपंच ज्ञानेश्वर देवकते,साहेबराव पाटील,ज्ञानदेव तुकाराम देवकते,सुरज कोळी,राजू चौगुले,रेवाप्पा माळी,नारायण नाईक, कुडणूरचे उपसरपंच गुलाब पांढरे,सोसायटीचे संचालक बाळासाहेब चव्हाण,कुडणूरचे सरपंच बाबासाहेब सरगर,सेवानिवृत्त अधिकारी बाबासाहेब नदाफ,जिरग्याळचे सरपंच रमेश कोरे, ग्रा.पं.सदस्य देवदास पाटील,सोसायटीचे चेअरमन भारत गायकवाड,ग्रा.प.सदस्य गणेश पाटोळे,विकास वाघमारे,हर्षवर्धन चव्हाण,दिपक कोळी,बाळासाहेब कोळी,,सागर चव्हाण,सागर महाजन,सुरेंद्र सरनाईक,सोसायटी संचालक रमेश चव्हाण,पप्पू वाघमारे,अजित माने,अमिर नदाफ,धनाजी चव्हाण,तानाजी चव्हाण,सुभाष पाटोळे,साहेब आत्तार,
कुडणूरचे नेते अमृत पाटील,गोविंद शिंदे,बाळासाहेब शांत,दिपकभाऊ चव्हाण,मालोजी भोसले,मनोहर भोसले,अंबादास कुंभार,अजित चव्हाण,संतोष बंडगर,अशोक सवदे,प्रंशात माळी,अजित भोसले,एकुंडीचे महादेव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.प्रास्ताविक अजित खतीब,सुरेन्द्र सरनाईक यांनी केले.अमिर नदाफ,महेश पाटील,सुरज महाजन,साहेबराव भोसले,गोटू शिंदे यांनी नियोजन केले.दरम्यान अभिजीत दादा चव्हाण यांच्या ४४ व्या वाढदिवसानिमित्त उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.
डफळापूर : बाजार समिती संचालक अभिजीत चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले.