सांगली: तासगाव, इस्लामपूर, आष्टा, शाहूपुरी कोल्हापूर आणि दापोली आदी ठिकाणी बंद घरे फोडून १८ लाखाचा ऐवज लंपास केलेल्या गुन्ह्याचा छडा लावण्यात आला आहे.याप्रकरणी पंढरपूरातील चोरट्यास अटक करत त्यांच्याकडून १८ लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
कर्नाटकातील कारागृहातून जामीनवर बाहेर आल्यानंतर सांगलीसह रत्नागिरी, कोल्हापूर जिल्ह्यात त्याने तासगाव, इस्लामपूर, आष्टा, शाहूपुरी कोल्हापूर आणि दापोली आदी ठिकाणी बंद घरे फोडून तब्बल १८ लाखाचा ऐवज लंपास केला होता.
दाखल गुन्ह्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांने कसून तपास करत पंढरपूरच्या संशयित लखन कुलकर्णी उर्फ सचिन माने (वय ३०, रा. अनिलनगर, पंढरपूर) याला सांगली येथून ताब्यात घेतले आहे.त्याच्याकडून ३० तोळे सोन्याचे व १५१ ग्रॅम चांदीचे दागिने आणि १ लाख ६० हजार रोख असा सुमारे १८ लाखाचा ऐवज हस्तगत करण्यात आले असून न्यायालयाने चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे न्यायालयाने दिले आहेत.