जत : सिंदूर ता.जत येथे किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणाच्या रागातून भावकीतील एकाचा तिघांनी दगडाने ठेचून खून केल्याचा प्रकार समोर आला आहे.गंगाप्पा परापा मगदूम (वय 33) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. हि घटना तालुक्यातील सिंदूर-बसर्गी हद्दीलगत घडली आहे.शुक्रवारी दुपारी ही घडली.पोलीसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, मृत गंगाप्पा हे सिंदूर गावापासून ३ किलोमीटर अंतरावर असलेल्या वस्तीवर राहत होते.वर्षभरापुर्वी संशयित आणि गंगाप्पा यांच्यात वाद झाला होता. शुक्रवारी दुपारी गंगाप्पा आणि संशयितांमध्ये पुन्हा किरकोळ कारणावरून वाद झाला.गंगाप्पाला संशयितांनी दगडाने मारहाण केली. काहीजणांनी हा वाद मिटविण्याचा प्रयत्न झाला.जखमी गंगाप्पा हा उपचारासाठी व पोलिसात तक्रार देण्यासाठी जतकडे जात असताना संशयित तिंघानी त्याला सिंदूर-बसर्गी हद्दीत अडविले आणि पुन्हा दगडाने गंभीर मारहाण केली.यात गंगप्पाला गंभीर जखमी झाला.त्यालाउपचारासाठी सांगलीला नेत असताना त्याचा रस्त्यात मृत्यू झाला.
कर्नाटक लगतच्या सिंदूर येथील गंगाप्पा मगदूम व संशयिता बरोबर वाद होता.शुक्रवारी दुपारी पुन्हा हा वाद उफाळून आला.या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले.संशयितांनी चिडून गंगाप्पा यांच्या डोक्यात दगडाने मारहाण केली.त्यानंतर ते पळून गेले.परिसरातील नागरिकांनी जखमी गंगाप्पा यांना उपचारासाठी जत येथे आणले,त्याची पकृत्ती चिंताजनक असल्याने सांगली येथे नेत असतानाच त्यांचा वाटेत मृत्यू झाला. घटनेबाबत पोलिसात रात्री उशिराने नोंद झाली आहे.दरम्यान,घटना नेमकी कोणत्या कारणातून झाली, हे अद्याप समोर आलेले नाही.जत पोलीस अधिक तपास करत आहेत.