युवकाची आत्महत्या खासगी सावकारीतून?
तासगाव तालुक्यातील बोरगाव येथील रोहिदास सर्जेराव माने या युवकाने खासगी सावकारांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची चर्चा आहे. याप्रकरणी तीन सावकारांविरोधात गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.
या सावकारांच्या 10 टक्के व्याजाच्या तगाद्याने रोहिदास याने 17 ऑक्टोबर रोजी विषारी औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली आहे. याप्रकरणी खासगी सावकारी, आत्महत्येस प्रवृत्त करणे, मारहाण, जातीवाचक शिवीगाळ, अपहरण, संगनमताने त्रास देणे, अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे संबंधित सावकारांवर दाखल होण्याचे संकेत मिळत आहेत.
हे गुन्हे दाखल होऊ नयेत यासाठी सावकारांनी ‘फिल्डिंग’ लावली आहे. बड्या नेत्याच्या माध्यमातून या सावकारांनी पोलिसांवर दबाव आणल्याची चर्चा आहे.