डफळापूर : शिंगणापूर व कुडणूर येथील या दोन्ही गावात जिल्हा परिषद फंडातून बांधण्यात आलेल्या आरोग्य केंद्रांचे उद्घाटन आमदार मा.विक्रमसिंह सावंत महादेव पाटील यांच्याहस्ते संपन्न झाले. ग्रामीण भागांसाठी दर्जेदार आरोग्य सुविधा पायाभूत ठरतात.त्यामुळे दर्जेदार आरोग्य केंद्र असणे क्रमप्राप्त ठरते.इथूनपुढेही डफळापूर जिल्हा परिषद गटाच्या विकासासाठी असेच कार्यरत राहू हा विश्वास यानिमित्ताने आ.सावंत यांनी दिला.
दिलेल्या शब्दाला जागत आज वचनपुर्ती पुर्ण केली व सर्व सामान्य लोकांच्या समवेत हा सोहळा संपन्न झाला व त्यांच्या चेहऱ्यावरती हास्य बघुन केलेल्या कामाची पोचपावती म्हणुन त्यांनी कौतुक केले. यावेळी जत तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाबासाहेब कोडग, भूपेंद्र कांबळे ,रामचंद्र पाटील,अज्ञान पांढरे सतीश पांढरे यांच्यासह नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.