याप्रकरणी तारतंत्री गिरीश नामदेव दहे (रा. संख) यांनी फिर्याद दिली आहे.संशयित आरोपी शेतकरी सुखदेव
अंबाजी कोकरे, शामराव देवाप्पा जावीर, धुळोबा गणपती माने (तिघे रा.मोटेवाडी),यलाप्पा निलाप्पा पुजारी (रा. कागनरी), बाबू रज्जाक शेख (रा. तिकोंडी) या पाच जणांवर एकूण २० हजार ७९० रुपयांची वीजचोरी केल्याप्रकरणी विद्युत कायदा २००३ च्या कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वीजचोरी झालेल्या या घटना उमदी पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने जत पोलिसांनी फिर्याद नोंद करून शून्य नंबरने उमदी पोलिस ठाण्यास गुन्हे वर्ग केले आहेत.