उच्च शिक्षणापासून रोखण्याचे काम, विद्यार्थी संतप्त, मग एलएलएम कोर्स कशासाठी सुरू आहेत ? विद्यापीठाकडे गाईड उपलब्ध नाहीत का ?
सांगली : नुकेतच दिक्षांत समारंभात शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थी हे जागतिक विद्यापीठासोबत स्पर्धा करतील असे विधान काहींनी केले. परंतु हे विधान केवळ कागदावर. प्रत्येक्षात उच्च शिक्षण घेणाऱ्या ‘विधी अभ्यासक्रम’ करिता विद्यापीठाने दारे बंद केली आहेत. पीएचडी प्रवेशाकरिता विद्यापीठाने दि.२१.१२.२०२३ रोजी परिपत्रक काढून विद्यार्थ्यांचे पीएचडी करिता फॉर्म मागवले आहे. प्रसिद्ध जाहिरातीनुसार एकूण ३४ कोर्सेस करिता जवळपास १९८ जागा पीएचडी करिता आहेत. यामध्ये विधी अभ्यासक्रमाचा समावेश नाही. जर उच्च शिक्षणासाठी विद्यापीठात जागाच उपलब्ध नाही तर मग एलएलएम कोर्सेस सुरु का ठेवले आहेत याचा खुलासा विद्यापीठाने करावा. हा संशोधक विद्यार्थ्यांवर अन्याय असल्याचे मत रिपब्लिकन स्टुडंट्स युनियनचे संघटना प्रमुख अमोल वेटम यांनी केले.
हा अन्याय केवळ विद्यार्थ्यावर नाही तर सहाय्यक / सहयोगी प्राध्यापकांवर देखील : वेटम
गोरगरीब, मागासवर्गीय संशोधक विद्यार्थी हे खासगी विद्यापीठात लाखो रुपये ‘फी’ भरून पीएचडीकरिता प्रवेश घेऊ शकत नाहीत. सहाय्यक / सहयोगी प्राध्यापकांना बढती करिता किमान दोन संशोधक विद्यार्थ्यांना गाईड म्हणून मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. विधी पीएचडीच्या जागा नसल्याने यांचे देखील नुकसान आहे. विद्यार्थ्याना मार्गदर्शन करण्यासाठी विद्यापीठाकडे गाईड नाहीत का ?. विद्यार्थी ज्या विद्यापीठात शिकत आहे त्याला प्राधान्य पीएचडीकरिता दिले जाते, इतर विद्यापीठातील विद्यार्थ्यांना कमी जागा अथवा शून्य जागा मिळते. यामुळे शिवाजी विद्यापीठाचे संशोधक विद्यार्थी हे सर्व स्तरातून बाहेर फेकले जाणार आहेत. असे मत वेटम यांनी व्यक्त केले. यामुळे कुलगुरू यांनी सहानभूतीने विचार करून न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.