विश्व विजय नोकरी,उद्योजक महामेळावा | आ.विक्रमसिंह सावंत यांच्या वाढदिवसानिमित्य भरगच्च कार्यक्रम ; आमदार चषक क्रिकेट,रांगोळी स्पर्धेचे आयोजन

0
16
जत : जतचे विद्यमान लोकप्रिय आमदार, सांगली जिल्हा काँग्रेस कमेटीचे जिल्हाध्यक्ष विक्रमसिंह सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त चार फेब्रुवारी रोजी जत येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.आ. सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त विश्व विजय नोकरी व उद्योजक महामेळावा, आमदार चषक क्रिकेट स्पर्धा व रांगोळी स्पर्धा पार पडणार आहेत.आ.विक्रमसिंह सावंत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत विक्रम फौंडेशनच्या वतीने तालुक्यातील बेरोजगार तरुणांच्या हाताला रोजगार मिळावा यासाठी विश्व विजय नोकरी व उद्योजक महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.या मेळाव्यास राज्यातील नामवंत ३८ कंपन्या सहभागी होणार आहेत. एक ते तीन फेब्रुवारी दरम्यान रोजगार पूर्व प्रशिक्षण घेण्यात येणार आहे.

 

त्यानंतर चार फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता आर.आर.कॉलेज येथे विश्व विजय नोकरी व उद्योजक महामेळावा पार पडणार आहे. या मेळाव्याचे उदघाटन कोल्हापूरचे उपजिल्हाअधिकारी मल्लीकार्जुन माने यांच्या हस्ते होणार आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे महसूल विभागाचे उपायुक्त रामचंद्र शिंदे राहणार आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून भारती बँकेचे संचालक जितेशभैय्या कदम, जतचे प्रांताअधिकारी अजयकुमार नष्टे,आर. आर.कॉलेजचे प्राचार्य सुरेश पाटील हे उपस्थित राहणार आहेत. महामेळाव्याबरोबरच आमदार चषक क्रिकेट स्पर्धा व रांगोळी स्पर्धा अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात या दिवशी करण्यात आले आहे.आ.सावंत यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी कर्नाटक राज्याचे माजी उपमुख्यमंत्री  आ. लक्ष्मण सवदी, महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री आ. सतेज ऊर्फ बंटी पाटील, आ. डॉ. विश्वजीत कदम, कर्नाटक राज्याचे एस.टी. महामंडळाचे अध्यक्ष आमदार राजू कागे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे उपाध्यक्ष विशाल पाटील,  भारती बँकेचे संचालक जितेशभैय्या कदम हे उपस्थित राहणार आहेत.
महामेळावा व अभिष्टचिंतन सोहळ्यास जतकरांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जत तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष बाबासाहेब कोडग, सांगली कृषी उत्पन बाजार समिती सभापती सुजयनाना शिंदे,  विक्रम फौंडेश अध्यक्ष अँड. युवराज निकम यांनी पत्रकार परिषदेत केले. यावेळी ज्येष्ठ नेते आपाराया बिराजदार, जिल्हा बँकेचे संचालक सरदार पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव पाटील, माजी सभापती बसवराज बिराजदार, संचालक बिरापा शिंदे, बाबासाहेब माळी, माजी सभापती भूपेंद्र कांबळे, माजी नगरसेवक निलेश बामणे, परशुराम मोरे, नाथा पाटील,  वहाब मुल्ला, संजय सावंत, दत्ता निकम , मल्लेश कत्ती, संतोष जगताप, दिपक अंकलगी, मारुती पवार आदी उपस्थित होते.
 मार्केट कमेटी आवारात रंगणार अभिष्टचिंतन सोहळा
आ.विक्रमसिंह सावंत यांच्या वाढदिवसानिमित्य जत मार्केट कमेटी आवारात आ. सावंत यांचा अभिष्टचिंतन सोहळा पार पडणार आहे. आ. सावंत हे चार फेब्रुवारी रोजी नऊ ते अकरा दरम्यान आर.आर कॉलेज येथील कार्यक्रमात शुभेच्छा स्वीकारतील त्यानंतर जत मार्केट कमेटी आवारात आ.सावंत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.
हार नको शालेय साहित्य आणा
आ.विक्रमसिंह सावंत यांच्या वाढदिनी शुभेच्छा देताना हार, तुरे न आणता शालेय साहित्य आणावे. वाढदिनी जमा झालेले शालेय साहित्य तालुक्यातील गरजू विद्यार्थ्यांना वाटप केले जाते. तेव्हा पुष्पहार न आणता शालेय साहित्य आणावे असे आवाहन आ.विक्रमसिंह सावंत अभिष्टचिंतन सोहळा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here