महात्मा गांधीचे स्वच्छ भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी क्लिन सांगली | हेल्दी सांगली अभियान ; पृथ्वीराज पाटील यांची माहिती

0
सांगली : स्वच्छ मन अस्वच्छ देहात आणि स्वच्छ शरीर अस्वच्छ शहरात राहू शकत नाही. आचार आणि विचारात स्वच्छता हवी. स्वच्छता ही बाहेरुन लादता येत नाही ती स्वतः अंगीकारावी लागते. म. गांधींचे स्वच्छ भारताचे स्वप्न  कृतीत येण्यासाठी पृथ्वीराज पाटील फौंडेशनच्या वतीने ‘क्लिन सांगली – हेल्दी सांगली’ अभियान राबवले जाते. आज बापूंच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून हुतात्मा दिनी काँग्रेस कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनची स्वच्छता केली. त्याबद्दल मी त्यांचे कौतुक व अभिनंदन करतो असे गौरवोद्गार पृथ्वीराज पाटील यांनी काढले.पृथ्वीराज पाटील फौंडेशन कार्यकर्त्यांच्या काँग्रेस भवन स्वच्छता उपक्रमावेळी ते बोलत होते.
Rate Card
पृथ्वीराज पाटील फौंडेशनच्या क्लिन सांगली – हेल्दी सांगली मोहिमेंतर्गत राबविलेल्या स्वच्छता मोहिमेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती आघाडीचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत कांबळे, काँग्रेस सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अजित ढोले,किसान सेलचे जिल्हाध्यक्ष महावीर पाटील,औद्योगिक सेलचे शहराध्यक्ष प्रशांत देशमुख, कामगार आघाडीचे शहराध्यक्ष संजय मोरे, अनुसूचित जाती आघाडी शहराध्यक्ष राजेंद्र कांबळे, महिला आघाडीच्या शहराध्यक्ष शमशाद नायकवडी, महिला ग्रामीण अध्यक्ष नंदा कोलप, निराधार निराश्रित महिला आघाडीच्या प्रतिक्षा काळे, किसान सेलचे आनंदा पाटील, दिव्यांग सेल प्रमुख सुरेश गायकवाड, नाना घोरपडे, आयुब निशाणदार व शहर जिल्हा काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.