डफळापूर : जत विस्तारित म्हैशाळ योजना पूर्ण करा या मागणीसाठी जत तालुक्यात सर्वपक्षीय चक्काजाम आंदोलन करण्यात आले.डफळापूर येथे सांगली-जत रस्ता रोकण्यात आला.पंचायत समितीचे माजी सदस्य दिग्विजय चव्हाण यांनी नेतृत्व केले.सकाळी दहापासून स्टँड नजिक सर्वपक्षीय नेते,पदाधिकारी आंदोलनास बसले होते.या रास्तारोकोमुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.अशाच पध्दतीने तालुक्यात अनेक ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आले.दरम्यान जत शहरात काही आंदोलनकर्त्यांना जत पोलिसांनी ताब्यात घेतले होते.काही वेळानंतर त्यांना सोडण्यात आले.
जत पश्चिम भागातील म्हैसाळ योजनेच्या बंधिस्त पाईपलाईनची कामे तातडीने करून पाण्यापासून वंचित राहिलेल्या भागाला पाणी द्यावे,म्हैसाळचे आवर्तन मेपर्यत सुरू ठेवावे.म्हैसाळ विस्तारितचे काम गतीने करावे,अशी मागणी यावेळी दिग्विजय चव्हाण यांनी केली.