घोडावत इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय स्पर्धेत एक लाखाचे बक्षीस 

0
3
जयसिंगपूर : महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई संचलित, शासकीय तंत्रनिकेतन, मिरज राज्यस्तरीय प्रकल्प स्पर्धेचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. त्या स्पर्धेमध्ये संजय घोडावत इन्स्टिट्यूटचे श्रीवर्धन अभिजीत पाटील, रसिका अनिल माने, ऋतुजा रवींद्र माने, शाहिद रमजान जमादार या चार विद्यार्थ्यांना ”कॉस्ट इफेक्टिव्ह इलेक्ट्रिक आयसीयु बेड विथ ड्वेल ऍक्टिव्हेशन“ या पकल्पास प्रथम क्रमांकाचे एक लाख रुपये बक्षीस प्रमाणपत्र आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रकल्पाचे वैशिष्ट्य सर्व डॉक्टरांना बेडच्या सुविधेमध्ये मोठा फायदा होणार असून या प्रकल्पामध्ये  इलेक्ट्रिक आयसीयु बेड सुविधा उपलब्ध असून हा बेड इतर बेडच्या तुलनेत कमी खर्चात मिळणार आहे. या बेडमध्ये जास्तीच्या सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत. हा प्रकल्प तयार करण्यासाठी श्री हॉस्पिटल इक्रूटमेंट इचलकरंजी यांनी विद्यार्थ्यांना अर्थसाह्य उपलब्ध करून दिले होते.

 

विद्यार्थ्यांच्या कुशल कल्पनेतून नवीन निर्मिती होऊन या संकल्पनेचा प्रत्यक्षात उपयोगाचे परीक्षण करून या प्रकल्पास प्रथम क्रमांकाचे पारितोषिक सन्मानपूर्वक प्रधान करण्यात आलेले आहे.इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार अभियांत्रिकी या विभागाच्या प्राध्यापिका रईसा मुल्ला यांनी या विद्यार्थ्यांना प्रमुख मार्गदर्शक म्हणून  मार्गदर्शन केलेले आहे.या विद्यार्थ्यांना  संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष श्री. संजयजी घोडावत, विश्वस्त विनायक भोसले इन्स्टिट्यूटचे प्राचार्य डॉ. विराट व्ही. गिरी यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here