उमदी,संकेत टाइम्स : भाजपने सांगली लोकसभेची उमेदवारी विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांना उमेदवारी जाहीर केल्याने जाहीर नाराजी व्यक्त करणारे जतच्या माजी आमदार विलासराव जगताप यांनी काय भूमिका घेतील याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांनी गेले दहा वर्षात एकही विकासात्मक कामे केली नाहीत,भाजपा अंतर्गत कलह निर्माण करून अन्य पक्षाच्या लोकांनाच जवळ करून भाजपमधील कार्यकर्त्यांची खच्चीकारण करण्यापलीकडे काही केले नाही त्यामुळे भाजपने संजयकाका पाटील यांना उमेदवारी देवू नये अशी मागणी विलासराव जगताप यांनी केले आहे.
त्यांना जिल्ह्यातील दुष्काळी फोरम मधील कांहीं नेत्यांनी साथ दिली होती.शिवाय सांगली जागेसाठी माजी आमदार,माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी उमेदवारी मागितली होती तरीही देशमुखांना डावलून तिसऱ्यांदा संजयकाका पाटील यांना उमेदवारी जाहीर केल्याने विलासराव जगताप यांनी पत्रकार परिषदेत जाहीर विरोध करून उमेदवारी बदलण्याची मागणी केली होती.जर उमेदवारी न बदलल्यास समविचारी लोकांना एकत्रित करून अन्य मार्ग अवलंबला जाईल असा इशारा दिला होता,मात्र विलासराव जगताप यांच्या भूमिकेला भाजपा पक्षश्रेष्ठींनी कानाडोळा केल्याची दिसते, त्यामुळे जगताप यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.सद्या संजयकाका पाटील यांचा प्रचार सुरू आहे, गावागावात गाठीभेटी सुरू केली आहे.त्यामुळे त्यांची उमेदवारी रद्द होणे तितकं सोपं नाही त्यामुळे जगताप यांनी काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.
विलासराव जगताप हे जतचे माजी आमदार आहेत, आणि जेष्ठ, मुसद्दी राजकारणी आहेत त्यांची बेरजेच्या राजकारणात अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असून खटक्यावर बोट जागेवर पलटी अशा स्वभावाचे व्यक्तिमत्व म्हणून जिल्ह्यात ओळख आहे.अशा नेत्यांची जिल्ह्यातील भाजपच्या कांहीं मंडळींनी त्यांची भाजपा मधून हकालपट्टीची मागणी केली आहे. जिल्ह्याचे नेतृत्व करणारे जगताप सारख्या जेष्ठ नेत्यांची पक्षातील सामान्य कार्यकर्त्यांनी हकालपट्टीची मागणी करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रकार असल्याचे भाजपा अध्यक्ष गोपाल माळी यांनी केले होते.
एकंदरीत भाजपकडून जगताप यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सुरू केले आहे,मात्र जगताप यांनी निर्णयावर ठाम असल्याचे सूत्रांकडून कळते.
जर जगताप यांची नाराजी दूर करण्यात भाजप अयशस्वी ठरला तर जत तालुक्यातील राजकीय समीकरण बदलणार आहे.त्याचा फटका भाजपच्या उमेदवाराला बसणार हे निश्चित आहे.