आणखीन एक विद्यार्थीही राज्य यादीत, जिल्ह्यातही प्रथमसह 4 विद्यार्थ्याचे यश
डफळापूर : डफळापूर मधील १ ली ते ४ थी पर्यंत असलेली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोळीवस्ती येथील विद्यार्थी आयटीएस परिक्षेत राज्यात चमकले असून तब्बल १६ विद्यार्थ्यांनी या राज्यस्तरीय स्पर्धेत उज्वल यश मिळवत शाळेचा नावलौकिक केला आहे.शाळेची श्राफल्या विनायक छत्रे हिने 200 पैंकी 200 मार्क मिळवत राज्यात पहिली तर कश्यप अमरसिंह चव्हाण 300 पैंकी 278 याने राज्यात दहावा क्रमांक मिळवित यश संपादन केले आहे.
त्याचबरोबर वैष्णवी संजय कोळी 200 पैंकी 190 जिल्ह्यात पहिला,श्रवण सचिन छत्रे 200 पैंकी 180 जिल्ह्यात सहावा, अथर्व गुलाब शिंदे 200 पैंकी 180 जिल्ह्यात सहावा,आराध्या सागर डांगे 200 पैंकी 172 जिल्ह्यात दहावा, अनन्या कृष्णदेव छत्रे 300 पैंकी 236 केंद्रात चौथा,आरुष मच्छिंद्र तानगे 200 पैंकी 170 केंद्रात पहिला,श्रावणी माणिकराव माने 300 पैंकी 180 ,चैत्राली प्रमोद छत्रे 300 पैंकी 168,वैष्णवी साहेबराव भोसले 300 पैंकी 158,अनिरुद्ध कृष्णदेव छत्रे 200 पैंकी 148 ,आरुषी सचिन चव्हाण 300 पैंकी 118 ,स्वरा दादासो माने 200 पैंकी 102 ,आराध्या उदय पाटील 200 पैंकी 88,श्रीवर्धन साहेबराव भोसले 200 पैंकी 92 मिळवत उज्वल यश संपादन केले आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्य शालेय व्यवस्थापन समिती कोळीवस्ती, गटशिक्षणाधिकारी शेख साहेब,केंद्रप्रमुख रतन जगताप,जाधव सर,संजय राठोड, सर्व पालकांचे मार्गदर्शन लाभले.