आटपाडी : “महाराष्ट्रात महाविकास आघाडीत ‘सांगली’च्या जागेवरून द्वंद्व सुरू आहे. हे चिंताजनक असून शिवसेनेची भूमिका मोदींच्या हुकूमशाहीला प्रोत्साहन देणारी आहे. सांगलीची जागा काँग्रेस व शिवसेनेच्या वादावर जागा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) ला देऊन तोडगा काढावा,” अशी मागणी तालुका सरचिटणीस नितीन डांगे यांनी केली आहे. ‘सांगली’च्या जागेवरून महाविकास आघाडीत काँग्रेस व शिवसेनेतील वाद मिटण्याची चिन्हे नसून तो चिघळत चाललाय. यामुळे महाविकास आघाडीच्या वाटचालीला ‘ब्रेक’ लागणार असल्याची भावना डांगे यांनी व्यक्त केली.
आमदार जयंत पाटील यांनी लक्ष घालून तोडगा काढावा. राष्ट्रवादीनेच सांगलीची जागा घ्यावी. सामान्य कुटुंबातील उमेदवाराला संधी द्यावी. राजारामबापू पाटील यांचे सहकारी आटपाडीचे रावसाहेब पाटील ५० वर्षे सामाजिक कार्यात आहेत. विचारवंत व धाडसी आहेत. अशा शेतकऱ्याच्या मुलाला राष्ट्रवादीने संधी देण्याची मागणी त्यांनी केली आहे. दुष्काळी भागाला खासदारकी आकाशातील चांदोबा मिळण्यासारखे आहे. पक्षाने ठरवले तर शक्य आहे.