नागपूर : निवडणूकीच्या धामधुमीत नेत्यांच्या गाडीच्या अपघाताचे सत्र सुरू आहे.नुकताच कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीला अपघात झाल्याचे वृत्त समोर येत असतानाच आमदार ॲड. आशिष जयस्वाल यांच्या वाहनाचा अपघात झाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या कार्यक्रमाला येत असलेल्या रामटेकचे आमदार ॲड. आशिष जयस्वाल यांच्या कारने विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारला जाेरात धडक दिली. यात महिला वकील गंभीर जखमी झाली असून, दाेन्ही कारचे चालक किरकाेळ जखमी झाले विशेष म्हणजे, त्या कारमध्ये आ.आशिष जयस्वाल नव्हते. ही घटना नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील केरडी फाटा परिसरात हा अपघात झाला आहे.