जत तालुक्याला वळीव पावसाने झोडपले, उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा 

0
5

जत‌ : जत‌ तालुक्यातील पश्चिम भागात आज,गुरूवारी सायंकाळी जोरदार वळीव पावसाने हजेरी लावली. दिवसभर वातावरणात प्रचंड उष्मा जाणवत होता. सायंकाळी चारच्या सुमारास अचानक गारांसह पावसाला सुरुवात झाली. वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्याने वीजपुरवठा खंडीत करण्यात आला होता.

सायंकाळी चारच्या सुमारास सुमारे पंधरा मिनिटे पडलेल्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता. मात्र पावणेपाचनंतर पुन्हा जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे उष्मापासून हैराण झालेल्या नागरिकांना काहीअंशी दिलासा मिळाला.डफळापूर येथे आठवडी बाजारात व्यापारी व भाजी विक्रेत्यांबरोबर नागरिकांची मोठी तारांबळ उडाली.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here