नव्या चेहऱ्यांना आमदारकीचे वेध;आ सावंत यांना कोण देणार टक्कर?

0
13
जत : महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवेर स्थित असलेला आणि पाणी प्रश्नावरुन बहुचर्तीत राहीलेला सांगली जिल्ह्यातील एक मतदारसंघ म्हणजे जत विधानसभा मतदारसंघ, खरंतर राज्यात अनेक सरकार आली-गेली परंतु जतचा पाणीप्रश्न मात्र अजून देखील पुर्णता संपलेला दिसत नाही. सततचा दुष्काळ, उपलब्ध नसलेला रोजगार आणि सीमावाद यामुळे हा मतदारसंघ विकासाच्याबाबतीत कुठेतरी मागे पडल्याच दिसुन येत आहे. अशातच झालेल्या लोकसभा निवडणुकीचे कल आणि मिळालेल्या मतांची संख्या पाहता यंदा जत विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या कॉंग्रेस ताकतवान पक्ष असून विद्यमान आमदार विक्रमसिंह सावंत यांना पराभूत करेल असा उमेदवार शोधताना विरोधी पक्षाना कसरत करावी लागत आहे.सध्यातरी इच्छूकांचा मोठा तथा दिसत आहे.
भारतीय जनता पार्टी यावेळी जत मधून नवीन आखनी करताना दिसत आहे. खरंतर या मतदारसंघाचे भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी लोकसभा निवडणुकी दरम्यानच भाजपाला रामराम ठोकला आहे. त्यामुळे भाजपा यंदा जत मधुन तगड्या चेहऱ्याच्या शोधात आहे. आणि त्यामुळे पर्यायाने भाजपाचे विधानसभा निवडणूक प्रमुख तथा केंद्रीय महामार्ग समिती संचालक तम्मणगौडा रवीपाटील यांचं नाव स्थानिक उमेदवार म्हणून सध्या तरी जतसाठी चर्चेत आहे.त्याशिवाय जिल्हा बँकेचे संचालक प्रकाशराव जमदाडेही तयारीत असून ते विधानसभा लढविणार हे निश्चित आहे.दरम्यान जत विधानसभा मतदारसंघाची राजकीय गणिते नेमकी काय आहेत हे येणारा काळच ठरवणार आहे.

 

तम्मणगौडा रवीपाटील यांचं राजकीय प्रवास जाड्रबोबलाद गावापासून सुरुवात झाली सोसायटी चेअरमन, जिल्हा परिषद सभापती ते केंद्रीय महामंडळावर संचालक असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. रवीपाटील हे भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जवळचे मानले जातात.
दुसरीकडे एकेकाळचे विलासराव जगताप यांचे कट्टर समर्थक असलेले प्रकाशराव जमदाडे हे सुद्धा यावेळी कोणत्याही परिस्थितीत विधानसभा लढविण्यासाठी तयारी करत आहेत.ते कोणत्या पध्दतीने राजकीय आखाड्यात उतरणार हे बघावे लागणार असून माजी खासदार संजयकाका पाटील त्यांच्या पाठीशी असल्याने सध्यातरी भाजपात त्याची ताकत आहे.
*जनसुराज्य ही तयारीत!*
महायुतीचा घटक पक्ष असलेला आमदार विनय कोरे यांच्या जनसुराज्य शक्ती पक्षा कडूनही काही कार्यकर्त्यांनी उमेदवारी मागितल्याचे कळते.त्यांना ही जागा महायुतीने सोडल्यानंतर त्यांचे उमेदवार स्पष्ट होणार आहेत.बसवराज ‌पाटील एंकूडीकर जनसुराज्यकडून इच्छुक आहेत.
विद्यमान आमदार सावंत यांच्याविरोधात सक्षम उमेदवाराचा शोध 
विद्यमान आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या विरोधात सध्या त्यांना पराभूत करेल,असा उमेदवार सध्यातरी तालुक्यात नसल्याने सध्या विरोधी पक्षाकडून इच्छूकांची संख्या मोठी आहे.सर्वजणचं लढणार अशा भूमिकेत आहेत.आमदार सावंत यांना पराभूत करेल अशा उमेदवाराचा सध्या शोध सुरू आहे.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here