कोल्हापूर : बदलापूर घटनेने राज्यात संतापाची लाट उसळलेली असताना कोल्हापुरातून एक हादरवणारं घटना समोर आली आहे.कोल्हापुरातील करवीर तालुक्यातील शिये गावात दहा वर्षीय चिमुरड्या मुलीची निर्घृणपणे हत्या करण्यात आलीय. या मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचाही संशय व्यक्त करण्यात येत आहे. पीडित मुलगी बुधवार दुपारपासून बेपत्ता होती. त्यानंतर सकाळच्या सुमारास एका शेतात तिचा मृतदेह आढळून आला आहे.या प्रकरणावर बोलताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोपीला कठोर शिक्षा दिली जाणार असल्याचे म्हटलं आहे.
बिहारमधील हे कुटुंब करवीर तालुक्यातील शिये येथे आलं होतं. पीडितेच्या काकाने मारल्यामुळे ती घराबाहेर पडली होती.रात्री १० वाजता मुलगी सापडत नसल्याची तक्रार पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली.घटनेचे गांभिर्य ओळखून पोलिसांनी शोध घेतला असता सकाळी तिचा मृतदेह ऊसाच्या शेतात सापडलेला आहे. लैंगिक अत्याचार झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई सुरु केली आहे. काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांची चौकशी सुरु केली आहे.