आगामी विधानसभेत आ.सावंतांचा पराभव निश्चित | – प्रकाश जमदाडे,विधानसभा लढविण्याची घोषणा

0
14
जत : मागील २५ वर्षांपासून आपण जतच्या राजकारणात सक्रिय आहोत. मार्केट कमेटी, पंचायत समिती, जिल्हा बँकेच्या माध्यमातून विलासराव जगताप यांनी संधी दिली त्या संधीचे सोने करून जतकरांची सेवा केली. आगामी विधानसभा निवडणुकीत जगताप यांना सोबत घेत निवडणूक लढविण्यास इच्छुक आहे. २०१४ पासून भाजपचे काम केले आहे.

पक्ष संधी देईल याचा आपणास विश्वास असून पक्षाने संधी दिल्यास आपण आगामी विधानसभेत आ. सावंतांचा निश्चित पराभव करू, असा विश्वास जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे यांनी यावेळी व्यक्त केला.

गेल्या दोन दशकापासून मी जत तालुक्यात समाजकारण करत आहे.लोकांच्या विश्वासावर मला अनेक पदावर काम करण्याची संधी मिळाली आहे.त्या माध्यमातून लोकांचे‌ प्रश्न सोडविण्याचा काम केले आहे.सतत जनतेच्या संपर्कात आहे,त्यामुळे जनतेने यंदा विधानसभा लढवा असा विश्वास दाखविल्याने यावेळी विधानसभा निवडणूक लढविणार आहे.विजयी आपलाच असणार असे उद्गार यावेळी प्रकाशराव जमदाडे यांनी काढले

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here