जिल्ह्याच्या, तालुक्याच्या राजकारणात विलासराव जगताप यांची भूमिका कायम महत्वाची राहिली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात विलासराव जगताप यांनी भुमिका स्पष्ट करावी. स्वतः लढावे किंवा बळ द्यावे, असे आवाहन करत सरदार पाटील यांनी भूमिका जाहीर करण्याची मागणी केली.
नेमका तोच धागा पकडत जगताप यांनी जनतेच्या बळावर ४० वर्षात प्रस्थापिताविरुद्ध लढलो, आमदारकीही मिळाली. पदाची आता अपेक्षा नाही पण मी मैदान सोडून पळून जाणाऱ्यापैकी नाही जनतेने ठरवलं आणि तुम्ही साथ दिली तर पुन्हा मी शड्डू ठोकून उभा राहणार, हे नक्की असल्याचे सांगत जगतापांनी आगामी विधानसभेचे रणशिंग फुंकले.