पुणे : पोटच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम बापाला २० वर्षे तुरुंगवास व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. वडगाव मावळ न्यायालयातील सत्र न्यायाधीश जे. एल. गांधी यांनी हा निकाल दिला.
संतोष मधुकर धुमाळ असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशनमध्ये कलम ३७६ एफ (२) व पोक्सो अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. स्वतःच्या राहत्या घरात पत्नी कामावर व मुलगा शाळेत गेला असताना बापाने धमकी देऊन मुलीवर बलात्कार केला होता. सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी वकील स्मिता मुकुंद चौगले यांनी हा खटला चालविला. सरकारी वकील म्हणून स्मिता चौगुले यांनी काम पाहिले.