जत तालुक्यासाठी संजीवनी ठरणारा म्हैसाळ जत विस्तारित प्रकल्प मंजूर झाल्यानंतर पहिल्या व दुसऱ्या टप्याची निविदाची कामे देखील चालू झाली आहेत.जत तालुक्याच्या वचिंत गावांना पाणी देणारी ही योजना गतीने पुर्णत्वाकडे जात आहे.या योजनेच्या कामाची आज अतिरिक्त मुख्य सचिव जलसंपदा दीपक कपूर यांनी प्रकल्पाची क्षेत्रीय पाहणी केली.या क्षेत्रीय दौऱ्यामध्ये म्हैसाळ येथील पंपगृह, बॅरेज, विस्तारीत योजनेचा बेडग येथील टप्पा क्र.1, ऊर्ध्वगामी नलिका, बेलंकि येथील जोड प्रवाही नलिका तसेच बोगद्याच्या कामाची पाहणी केली.याभेटी दरम्यान विस्तारीत योजनेच्या चालू असलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला.सायंकाळी वारणाली विश्रामगृह येथे महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ अंतर्गत सर्व सिंचन व बांधकामाधिन प्रकल्पांची आढावा बैठक घेण्यात आली.
या बैठकीमध्ये मा.अ.मु.स.श्री दीपक कपूर यांनी प्रकल्पांची सद्यस्थिती, अडचणी व आवश्यक निधी इ.माहिती घेतल्या व सर्व प्रकल्प कालमर्यादेत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच ही कामे करत असताना कामाच्या गुणवत्तेस प्रथम प्राधान्य देण्याच्या सूचना सचिवांनी दिल्या आहेत.या पाहणी दौऱ्यात कार्यकारी संचालक अतुल कपोले,मुख्य अभियंता श्री गुणाले,मुख्य अभियंता श्री धुमाळ व श्री. चोपडे कार्य.अभियंता श्री पवार,श्री कोरे तसेच इतर अधिकारी वर्ग उपस्थित होता.
५० टक्के कामे पुर्ण,४५० कोटीचा निधी खर्च
म्हैसाळ जत विस्तारित योजनेची एकाच वर्षामध्ये ५०% शीर्ष कामे पूर्ण झालेली असून त्यासाठी एकूण ४५० कोटी इतका खर्च करण्यात आलेला आहे. सदर कामे पूर्ण झाल्यास जत तालुक्यात ६५ गावांना सिंचनाचे पाणी उपलब्ध होणार आहे व दुष्काळी तालुका म्हणून ओळख असणाऱ्या जत तालुक्याचा पाण्याचा प्रश्न कायम स्वरुपी संपणार आहे.