राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा रविवारी गोळ्या घालून खून करण्यात आला. शहरातील नाना पेठेत ही घटना घडली. आंदेकर यांच्यावर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराचा पोलिसांकडून शोध घेण्याात येत आहे.
वनराज आंदेकर रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास नाना पेठेतील डोके तालीम परिसरात थांबले होते. त्यावेळी त्यांच्यावर हल्लेखोराने पिस्तुलातून पाच ते सहा गोळ्या झाडल्या. त्याबरोबरच त्यांच्यावर धारदार हत्यारांनी वारही केले.
या घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.वनराज यांच्यावर वर्चस्वाच्या वादातून गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. नाना पेठेत आंदेकर टोळीचा दबदबा आहे.
गोळीबार करून धारदार शस्त्राने वार
एका टू व्हीलरवरून दोघेजण आले आणि त्यांनी थेट वनराज आंदेकर यांच्यावर फायरिंग केली. आंदेकर यांच्यावर पाच राऊंड फायर केल्यानंतर धारदार शस्त्राने त्यांच्यावर हल्लाही करण्यात आला. फायरिंग झाल्यानंतर घटनास्थळी गर्दी झाली आहे. हॉस्पिटलच्या बाहेर देखील त्यांचे कार्यकर्ते आणि समर्थक जमायला सुरुवात झाली होती.