डफळापूर : येथील राजू मल्लाप्पा एंकुडे यांच्या राहते व दुकान गाळ्यात शनिवारी मध्यरात्री अज्ञात स्फोटाने घराचे मोठे नुकसान झाले.मुख्य बाजारपेठेत असलेल्या या घरात नेमका कशामुळे स्फोट झाला हे अद्याप कळालेले नाही.महसूल,जत पोलीसाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी येथे भेट दिली.विविध पथकाकडून तपासणी करण्यात आली आहे.
एकुंडे कुंटुबियासह शनिवारी या घरातील वरच्या मजल्यावर झोपी गेले होते.मध्यरात्री अचानक स्फोट झाल्याने घराचे पत्रे,कुंभीचे सिमेंट व दुकान गाळ्याचे स्वेटर उडून तब्बल दहा फुटावर फेकले गेले.दुकान गाळ्याचे स्वेटर स्फोटामुळे पुढील बाजूच्या दहा फुटावरील रफिक आत्तार यांच्या दुकानच्या स्वेटरवर आदळल्याने स्वेटर,फर्नीचरचे नुकसान झाले आहे.मध्यरात्री अचानक स्फोट झाल्याने भितीचे वातावरण पसरले होते.
दरम्यान राजू एंकुडे यांचे कुंटुब वरच्या मजल्यावर झोपी गेल्याने जिवीतहानी टळली आहे.मात्र घराचे दुकान गाळ्याचे मोठे नुकसान झाले आहे. स्फोट संडास टाकीतील गँसमुळे झाल्याचे प्राथमिक अंदाज आहे.पोलीसांचे डॉग, बॉम्ब शोधक पथकाकडून याबाबत तपासणी करून नमुने नेहण्यात आले आहेत.
डफळापूर येथील राजू एंकुडे यांच्या घात स्फोट झाल्याने घराचे नुकसान झाले आहे.