लग्नासाठी वेळ नाही

0
13
साउथस्टार तमन्ना भाटिया विजय वर्मासोबतच्या डेटिंगच्या अफवांमुळे खूप दिवसांपासून चर्चेत आहे. एवढेच नाही तर त्यांनी सर्वांसमोर त्यांचे नाते स्वीकारले आहे. त्यांच्या लग्नाबद्दल अनेकदा चर्चा होते, ज्याबद्दल त्यांचे चाहतेही खूप उत्सुक असतात. नुकतेच तमन्नाने तिच्या लग्नाबद्दल आणि विजयसोबतच्या रिलेशनशिपबद्दल सांगितले.

 

तमन्ना म्हणते, ‘मी सध्या लग्नाच्या विचारात नाही. खरंतर आता आम्ही आमच्या कामावर लक्ष केंद्रित करत आहोत. आमच्याकडे आमच्या वेगवेगळ्या वर्क असाइनमेंट्स आहेत. त्या जोपर्यंत पूर्ण होत नाहीत आणि आम्ही लग्नासाठी पूर्ण तयार आहोत असे वाटत नाही, तोपर्यंत आम्ही लग्नाचा विचार करणार नाहीत.’
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here