‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनांतर्गत राज्यात महिलांचे अर्ज स्वीकृतीसाठी अंगणवाडी सेविका व्यतिरिक्त इतर प्राधिकृत व्यक्तींना देण्यात आलेले अधिकार रद्द करण्यात आले असून, ६ सप्टेंबरच्या शासन निर्णयानुसार फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकांमार्फत अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्यात आली आहे.
राज्य शासनाच्या या योजनेत पात्र महिलांना महिन्याला १५०० रुपये दिले जातात. या योजनेंतर्गत नोंदणी सप्टेंबरमध्ये सुरू ठेवण्यास २ सप्टेंबरच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली. यापूर्वी अर्ज स्वीकारण्यासाठी नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका, समूह संघटक मदत कक्षप्रमुख, आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, अंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र, आदी ११ प्राधिकृत व्यक्तींना प्राधिकृत करण्यात आले होते.
आता ६ सप्टेंबरच्या शासन निर्णयानुसार अंगणवाडी सेविका व्यतिरिक्त इतर सर्व प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकृतीचे देण्यात आलेले अधिकार रद्द करण्यात आले आहेत.