दीपिका-रणवीरला कन्यारत्न

0
6

मुंबई : बॉलीवूडमधील लोकप्रिय कपल दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग आई-बाबा झाले आहेत. दीपिका आणि रणवीरच्या घरी लक्ष्मी आली आहे. गणेश चतुर्थीच्या दुसऱ्याच दिवशी, रविवारी दीपिकाने गोंडस मुलीला जन्म दिला आहे.अभिनेत्री दीपिका पादुकोणला शनिवारी गणेश चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी पाचच्या सुमारास रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुंबईच्या रिलायन्स र फाऊंडेशन रुग्णालयात दीपिकाला – तिच्या आईबरोबर नेण्यात आले.

 

यादरम्यानचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाले होते. त्यानंतर रविवारी दीपिकाने एका गोंडस मुलीला जन्म दिल्याचे समोर आले आहे. दरम्यान, फेब्रुवारी २०२४ मध्ये दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून आई-बाबा होणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर दीपिकाचे बेबी बंप दिसत नसल्यामुळे फेक प्रेग्नेंसी असल्याचे म्हटले जाऊ लागले. अनेक कार्यक्रमांत दीपिका हाय हिल्समध्ये फिरताना दिसली. त्यावरूनही तिला ट्रोल केले गेले. पण काही दिवसांपूर्वी दोघांनी मॅटर्निटी फोटोशूट करून ट्रोलर्सची तोंड बंद केली.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here