अभिनेत्री तमन्ना भाटिया सध्या विजय वर्माला डेट रिलेशनशिपमधील रेड फ्लॅग आणि हार्टब्रेकवर भाष्य केलं. ती म्हणाली, ‘कोणीही आपल्या पार्टनरला बदलण्याचा किंवा आपण आहोत तसंच बनवण्याचा प्रयत्न करू नये. हे म्हणजे तुम्ही त्याला कंट्रोलमध्ये ठेवणं होतं. तसंच नात्यात खोटं बोलणंही रेड फ्लॅग आहे.
मी खोटं बोलणाऱ्या लोकांसोबत राहू शकत नाही. विशेषतः छोट्या-छोट्या गोष्टीतही खोटं बोलणारे लोक मला आवडत नाहीत. सुरुवातीला जेव्हा जास्तच गिफ्ट मिळायचे तेव्हा मला वाईट वाटायचं. मी हे सगळं करू शकतो हे दाखवण्यासाठीच तो करत असल्याचं मला वाटायचं. यामुळे रिलेशनशिपमध्ये प्राइस टॅग लावला जातोय, असंही वाटायचं.’